…तोपर्यंत बदला पूर्ण होणार नाही! सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका, संजय राऊत यांचे ट्विट
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने मंगळवारी घेतला. हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पीओके आणि पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून हिंदुस्थानने दहशतवादी तळ उडवले. यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला असून याच पार्श्वभूमीवर गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती दिली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीमध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे मांडली. हिंदुस्थानी लष्कराचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात गुरुवारी ट्विट करत माहिती दिली आहे.
सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेने मांडलेली भूमिका
– पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या हिंदुस्थानी लष्कराचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
– या संकटाच्या काळामध्ये आम्ही सर्व एकजूट आहोत.
– पहलगाम येथे आपल्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला जात नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होणार नाही. या दहशतवाद्यांना दिल्लीतील इंडिया गेटसमोर आणा, त्यांची ओळख जगाला सांगा आणि त्यांना मारून पाकिस्तानमध्ये फेकून द्या. तरच आपला बदला पूर्ण होईल.
– पाकिस्तानचे स्लीपर सेल देशामध्ये सक्रिय असून आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ही जबाबदारी गृहमंत्रालयाची आहे.
All party meeting मे हमारी बात (शिवसेना UBT)
1. भारतीय सेना पर हमे गर्व है
2.इस संकट के घडी मे हम एकजूट है.
3.ऑपरेशन सिंदूर पुरा नही होगा जबतक 6 वो आतंकवादी जिसने हमारे बहेनोंका सिंदूर उजाडा था उनका खातमा नही होता. दिल्ली के इंडिया गेट के सामने लाकर उनकी पहेचांन करलो और उनको… https://t.co/qAWiLSO3P2— Sanjay Raut (@rautsanjay61) May 8, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List