‘तुला पँटमध्ये लघवी करावी लागेल’, त्या सीनसाठी दिग्दर्शकाची विचित्र मागणी; अभिनेत्रीने सांगितला तो धक्कादायक प्रसंग
बॉलिवूडमध्ये आपण पाहतो की आता वेगवेगळ्या जॉनरचे विषय, चित्रपट, सीरिज पाहायला मिळतात. त्यातील पात्रांमध्ये जीवंतपणा आणण्यासाठी, कलाकार विविध युक्त्या वापरतात किंवा काही वेळेला तर आश्चर्य वाटेल अशा युक्त्या वापरतात. अलीकडेच एका चित्रपटातील अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले की, दिग्दर्शकाने एका सीनसाठी तिला पँटमध्ये लघवी करण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर अभिनेत्रीने ही मागणी आनंदाने मान्य केली होती.स्वतः अभिनेत्रीने याबाबतची खुलासा केला आहे. ही अभिनेत्री आहे जानकी बोडीवाला. जिची जास्त चर्चेत आली ते ‘शैतान’ या चित्रपटामुळे.
त्या सीनसाठी अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची विचित्र मागणी
2024 मध्ये अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका यांच्यासोबत ‘शैतान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जानकी बोडीवाला. अलीकडेच, एका मुलाखतीत जानकीने या चित्रपटाच्या शुटींगचा एक प्रसंग शेअर केला. जिथे चित्रपटाचे दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञिक यांनी तिला एका महत्त्वाच्या सीनसाठी प्रत्यक्षात लघवी करण्यास सांगितले. जानकी म्हणाली, ‘मी या चित्रपटाचे गुजराती व्हर्जनही केलं होतं आणि मला तिथेही तेच सीन करायचे होते. जेव्हा आम्ही वर्कशॉप घेत होतो, तेव्हा दिग्दर्शक, ते खरोखरच एक चांगला माणूस आहेत. त्यांनी मला विचारलं, तू खरोखर हे लघवीचे दृश्य करू शकणार आहेस का? याचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. मला त्या सीनबद्दल ऐकून खूप आनंद झाला. एक अभिनेत्री म्हणून मला पडद्यावर ते करण्याची संधी मिळत होती. असं काही तरी करण्याची संधी मिळत होती की कदाचित असं कोणीतरी केलं असेल.”
“तुला पँटमध्ये लघवी करावी लागेल”
तेव्हा त्या दिग्दर्शकाने अभिनेत्रीला सांगितलं की तिला बॉलीवूडमधील वर्जनमध्येही तुला पँटमध्ये लघवी करावी लागेल, दिग्दर्शकाने केलेल्या या विचित्र मागणीसाठी पुन्हा एकदा जानकीने होकार दिला होता.
सीन शूट करताना नक्की काय अडचणी आल्या?
जानकीने पुढे स्पष्ट केले की “काही कारणांमुळे आणि अनेक रिटेकच्या आव्हानांमुळे दृश्य अशा प्रकारे चित्रित केले जाऊ शकले नाही. सेटवर हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य झाले नसते. म्हणून आम्हाला ते करण्याचा एक मार्ग सापडला. त्यापद्धतीने तो सीन आम्ही केला. पण मला आनंद होता की मला त्या सर्व गोष्टी करायला मिळाल्या ज्या मी प्रत्यक्ष जीवनात करू शकत नाही. आणि तो सीन खरोखरच माझा आवडता सीन आहे. आणि त्या दृश्यामुळे मी त्या चित्रपटाला हो म्हटलं.”
जानकीने प्रामुख्याने गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 2015 मध्ये कृष्णदेव याज्ञिक लिखित आणि दिग्दर्शित ‘छेलो दिवस’ या गुजराती चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी नंतर ओ सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये तारी,तंबूरो, , छुटी जसे छक्का, तारी मेट वन्स मोअर आणि नाडी दोष यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List