बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणच्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ? थिएटरमधील खुर्च्या रिकाम्याच
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. एका अतिशय गरीब घरातून आलेला मुलगा बिग बॉस जिंकला यातच सर्वांना आनंद होता. आता सूरजच्या जीवनावर आधारित ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाचा जेव्हा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित झाला तेव्हा सूरजचा अभिनय पाहून अनेकांनी टीका केली होती. आता थिएटरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण थिएटर रिकामे असल्याचे दिसत आहे.
‘शब्दवेडे’ या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ‘झापुक झुपूक’ सिनेमाचा थिएटरमधील शो दाखवण्यात आला आहे. या शोसाठी केवळ दोन जण गेले आहेत. बाकी संपूर्ण थिएटर रिकामे असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण बोलताना दिसत आहे की, ‘मंडळी सिनेमागृहात आम्ही आलो आहेत. सूरज चव्हाण इन्स्टाग्राम स्टारचा झापुक झापूक कोणता तरी सिनेमा आलाय तो पाहण्यासाठी. सरांना वाटत होते थिएटर फुललल असेल आणि असं एकदम फुलललल (उपरोधिकपणे) थिएटरमध्ये आम्ही दोघच सिनेमा पाहायला आलो आहोत. सिनेमा सुरु व्हायला एक मिनिट बाकी आहे १०चा शो आहे.’
वाचा: काश्मीरला यायचं असेल तर कलमा शिक, नाहीतर…; पाकिस्तानी मित्राने अभिनेत्रीला दिला होता इशारा
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की ‘झापुक झुपूक’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने, ‘गरीब म्हणून जर तुम्ही कोणत्याही माकडचाळे करणाऱ्याला घेऊन चित्रपट बनवलात आणि तुम्ही अपेक्षा करत आहात की प्रेक्षकांनी आपले पैसे आणि वेळ घालवून ते बघायला यावे तर हे साफ चुकीचे आहे.आणि परत तुम्हीच म्हणणार की प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे पाठ फीरवतो.अरे काहीतरी दर्जा ठेवा.उत्तम चित्रपटाला मराठी प्रेक्षक नेहमीच चांगला प्रतिसाद देतो.ह्या सूरज चे माकडचाळे बघायला कोण जाणार’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘खूप छान वाटले, आज जर प्रेक्षकांनी याला डोक्यावर घेतले, तर उद्या गल्लोगल्लीत असे, झापुक झुपूक पैदा होतील. सर्व सुजाण नागरिकांना मनःपूर्वक धन्यवाद’ असे म्हटले आहे.
झापुक झुपूक सिनेमाविषयी
‘झापुक झुपूक’ हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २४ ते २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. आता येत्या काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List