शिवसेनेच्या महानोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; 25 नामांकित कंपन्यांचा सहभाग
शिवसेना-युवासेनातर्फे शनिवारी गिरगाव येथे आयोजित केलेल्या महानोकरी मेळाव्याला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामध्ये 25 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. एपूण 1950 रिक्त पदांसाठी मुलाखती झाल्या. त्यातील काही जणांना तिथल्या तिथे नियुक्ती पत्रदेखील देण्यात आले.
युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ व शाखाप्रमुख शशिकांत पवार यांनी आयोजित केलेल्या या महानोकरी मेळाव्याला शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, राजपुमार बाफना, अशोक धात्रक, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे व दक्षिण मुंबईमधील सर्व शिवसेना-युवासेना पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी युवासेनेच्या रोहित महाडिक, मिलिंद झोरे, प्रियांका गोकर्ण, अल्केश म्हेत्रे, प्रशांत धनावडे, रौनक बैराई, वरुण खुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List