पालिकेने वेसावेमध्ये पाच बहुमजली इमारती पाडल्या, आणखी 35 अनधिकृत बांधकामे पाडणार

पालिकेने वेसावेमध्ये पाच बहुमजली इमारती पाडल्या, आणखी 35 अनधिकृत बांधकामे पाडणार

मुंबई महानगरपालिका अनधिपृत आणि अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई सुरू केली असून आज के पश्चिम विभागात येणा-या वेसावे येथे पाच बहुमजली इमारतींवर तोडकामाची कारवाई केली. आणखी 35 अनधिपृत बांधकामांवरही कारवाई केली जाणार आहे, असे मुंबई महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) अनधिपृत बांधकामे करण्यात आली होती. याबाबत संबंधितांना वेळोवेळी नोटीस बजावून बांधकाम तोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून काही कारवाई करण्यात न आल्याने तसेच दलदलीच्या क्षेत्रातील या अनधिपृत बांधकामांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने पालिका उपायुक्त (परिमंडळ-4) भाग्यश्री कापसे आणि के पश्चिमचे साहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. 5 हँड ब्रेकर, 8 गॅस कटर तसेच 8 जनरेटरच्या सहाय्याने इमारतीचे पाडकाम करण्यात आले.

या इमारतींवर झाली कारवाई

वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (कोस्टल रेग्यूलेशन झोन) तेरे गल्लीतील पुटूर हाऊस (तळमजला +5), वेसावे पंप हाऊससमोरील साईश्रद्धा निवास (तळमजला +1), गोमा गल्ली येथील नागा हाऊस (तळमजला +4), मांडवी गल्ली येथील झेमणे हाऊस (तळमजला +3), बाजार गल्ली येथील गणेश सागर (तळमजला +3) या इमारतींवर करावाई करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;