तिचे जग- जग गांभीर्याने विचार करेल?

तिचे जग- जग गांभीर्याने विचार करेल?

>> डॉ. ऋतू सारस्वत

पुरुषांच्या तुलनेत महिला अनारोग्यासह जगतात असे दिसून आले आहे. महिलावर्ग आर्थिक फायद्याच्या कोष्टकात बसत नाही. त्यामुळे त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. शिवाय त्यांच्या कामाला आर्थिक रूपातून फायदेशीरही मानले जात नाही. म्हणूनच त्यांच्या आरोग्य समस्येकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र आता सर्वच राष्ट्रांनी याबाबत गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.

भारतामध्ये बहुतांश घरातील महिलावर्ग आरोग्याबाबत फार कुरबुरी करताना दिसत नाही. मनातील खदखद किंवा अस्वस्थता बोलून न दाखवता निमूटपणाने सहन करण्याचा स्वभाव भारतीय महिलांमध्ये वर्षानुवर्षांपासून दिसतो. याच स्वभावामुळे त्या आपले आजारपणदेखील अंगावर काढत असतात. पण यातून अचानक गंभीर आजाराची घंटी वाजते आणि सर्वजण खडबडून जागे होतात. महिलांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे वर्षानुवर्षे होत आले आहे. आता चित्र बदलण्याची वेळ आली आहे.

 ‘ब्ल्यूप्रिंट टू क्लोज द वुमेन्स हेल्थ गॅप ः हाऊ टू इम्प्रुव्ह लाइफ अँड इकोनॉमिज फॉर ऑल’ नावाच्या अहवालानुसार, पुरुषांच्या तुलनेत महिला आपले 25 टक्के आयुष्य खराब आरोग्यासह जगतात असे दिसून आले आहे. हा अहवाल महिला सक्षमीकरणाचा गाजावाजा करणाऱया सभ्य समाजाला आरोपीच्या पिंजऱयात उभे करणारा आहे. केवळ विशिष्ट राष्ट्रेच नव्हे, तर संपूर्ण जग महिलांच्या आरोग्याबाबत फारशी काळजी करत नसल्याचे ढळढळीत सत्य यातून समोर आले आहे. यामागच्या कारणांची मोठी यादी आहे. परंतु महिलावर्ग आर्थिक फायद्याच्या कोष्टकात बसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते. शिवाय त्यांच्या कामाला आर्थिक रूपातून फायदेशीरही मानले जात नाही. म्हणूनच त्यांच्या आरोग्य समस्येकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. म्हणूनच महिलांच्या आरोग्याप्रति कुटुंब आणि समाज असंवेदनशील दृष्टीने पाहत असल्याचे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.

 2021 मध्ये ‘जर्नल ऑफ पेन’मध्ये प्रकाशित मियामी विद्यापीठाच्या अभ्यासात म्हटल्यानुसार एखाद्या रुग्णाच्या आजाराची तीव्रता ती महिला आहे की पुरुष यानुसार पाहिली जाते. या अभ्यासाच्या वेळी 70 टक्के अमेरिकी महिला जुनाट आजाराने पीडित असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात त्यांचे अनुभव ऐकले तर त्यांच्या आजाराला पुरुषांच्या तुलनेत फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे स्पष्ट झाले.

जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन-2020मध्ये प्रकाशित अहवाल ‘सेस डिफरन्स कार्डिओव्हॅस्कुलर इन मेडिकेशन प्रिक्रिप्शन इन प्रायमरी केस ः अ सिस्टेमॅटिक रिह्यू अँड मेटा
अॅनालिसीस’नुसार, महिलांत पुरुषांच्या तुलनेत अॅस्पिरीन, कॉलेस्ट्रॉल कमी करणारे स्टॅटिन, रक्तदाबाच्या गोळय़ा घेण्याचे प्रमाण कमी आहे. यामागचे एक कारण म्हणजे, नोकरदार असो किंवा गृहिणी असो, त्यांचे आरोग्य चांगलेच असते, असा एक पूर्वग्रह पुरुषसत्ताक समाजात दिसून येतो.

महिलांच्या आरोग्यावर पुरेसा खर्च न करण्याची मानसिकता ही आताची नसून, पूर्वापार चालत आलेली असून कोणत्याही अभ्यास अहवालातदेखील त्यांना स्थान दिलेले दिसून येत नाही. त्याचा परिणाम म्हणजे, महिलांच्या आरोग्याच्या स्थितीविषयी सर्वंकष माहितीचा अभाव दिसून येतो आणि त्याचा फटका उपचाराच्या वेळी बसतो.

महिलांच्या आरोग्याच्या चर्चेला केवळ मासिक पाळी, बाळंतपण आदी गोष्टीपुरतीच मर्यादित ठेवले असून ती बाब क्लेशदायक आहे. महिलांच्या आरोग्यासंबंधी भारताचा विचार केला तर त्याचे मूल्यांकन करताना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भारतीय सांख्यिकी संस्था, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषद आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संयुक्त अभ्यासाचे आकलन करावे लागेल. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशातील महिलांच्या आरोग्याला कुटुंबात आणि समाजात गांभीर्याने पाहिले जात नाही. बहुतांश महिला आपल्या आरोग्यविषयी समस्येवर मौन बाळगतात आणि त्यांच्या आरोग्याबाबत कोणी खर्चदेखील करायला तयार होत नाही. भारतात अनेक बुरसटलेल्या प्रथा असल्याने प्रसंगी उच्चशिक्षित महिलादेखील त्यांच्या आरोग्यविषयी समस्या उघडपणे सांगण्यास धजावत नाहीत.

भारतातील महिलांच्या आरोग्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे पोषणयुक्त आजाराचा अभाव. आरोग्यतज्ञांच्या मते, भारतातील एकूण महिलांपैकी निम्म्या महिला अशक्त (रक्त कमी असणे) आहेत. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, अशक्तपणा, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे यांसारख्या गोष्टींमुळे महिलांचे आरोग्य आजाराचा खंबीरपणे मुकाबला करू शकत नाहीत. परिणामी  त्यांच्या आरोग्यदायी जीवनात अडथळे येतात. महिलांच्या आरोग्याबाबतची उदासीनता त्यांचे जीवन संकटात टाकणारी आहे. महिलांच्या आरोग्याबाबत समाजात, कुटुंबात असणारी असंवेदनशीलता महिलांची तब्येत बिघडवणारी राहू शकते. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅम’च्या अहवालानुसार, 2023 मध्ये देशभरातील 35,691 महिलांचा मृत्यू कर्करोगाने झाला. म्हणजेच दर तासाला चार महिलांचा मृत्यू या जीवघेण्या आजाराने झालेला आहे. म्हणूनच आरोग्यदायी महिला कुटुंब, समाज, समुदाय आणि देशासाठी आवश्यक आहे.

महिलांच्या आरोग्यात सुधारणा केली तर 2040पर्यंत जगभरातील जीडीपीत वार्षिक 34.50 लाख कोटींची वाढ होऊ शकते, असे जागतिक आर्थिक मंच आणि मॅकिन्से हेल्थ इन्स्टिटय़ूटच्या संशोधनातून अलीकडेच निष्कर्ष काढण्यात आला. गेल्या शतकातील अर्थतज्ञ हे आर्थिक विकासाला जागतिक लोकसंख्येच्या आरोग्याशी जोडतात. म्हणून निरोगी लोकसंख्या विकासाला चालना देतात. जागतिक आरोग्य संघटनेचा ‘इकोनॉमिक अँड सोशल इम्पॅटस् अँड बेनिफिट ऑफ हेल्थ सिस्टम’ अहवालानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नात भर घालण्याचे काम शिक्षणाइतकेच आरोग्याने केले आहे. त्यामुळे आरोग्य चांगले नसणे आणि तब्येत चांगली राहत नसेल तर त्याचा परिणाम आर्थिक समृद्धीवर होतो. या गोष्टीचा दोन मार्गांनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. एक तर आरोग्य चांगले नसल्यास अकाली मृत्यूची शक्यता राहते आणि श्रमशक्तीचा आकार हा साहजिकच कमी होतो आणि विकासावर परिणाम होतो. दुसरे म्हणजे, आजारपणामुळे व्यक्ती, महिला आर्थिक रूपाने सक्रिय राहत नाही आणि त्यामुळे त्याच्या अंगी असणारी उत्पादनक्षमतादेखील कमी होते. म्हणूनच आरोग्यात सुधारणा झाल्यास आयुष्याला गुणवत्तापूर्ण आकार येतो आणि श्रमशक्ती तसेच उत्पादकतेतील तेजी या गोष्टी सर्वांगीण विकासात योगदान देण्याचे काम करतात. शेवटी जगातील निम्म्या लोकसंख्येच्या आरोग्याची हेळसांड करणे हे जागतिक अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही आणि ते सातत्याने धक्का पोचवणारे राहू शकते.

(लेखक समाजशास्राच्या अभ्यासक आहेत.)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कल्याण, डोंबिवलीत कोम्बिंग ऑपरेशन; 25 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, मध्यरात्री धडाकेबाज कारवाई कल्याण, डोंबिवलीत कोम्बिंग ऑपरेशन; 25 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, मध्यरात्री धडाकेबाज कारवाई
कल्याण डोंबिवली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सुमारे दोन तास चाललेल्या या मोहिमेत पोलिसांनी विविध...
पायधुनीत पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कर्जतमध्ये नवी मुंबईचे चार तरुण बुडाले 
India Pakistan War – 32 विमानतळांवरील उड्डाणे बंद
‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात महिलेचे गरळ समाज माध्यमातून टीका, पोलिसांत गुन्हा दाखल
पाकिस्तानला नाणेनिधीकडून एक अब्ज डॉलर्सची खिरापत; हप्ता मंजूर, हिंदुस्थानचा विरोध
दिग्दर्शकांनी कल्पनेत पाहिलेल्या व्यक्तिरेखांना तू तुझे खरे ‘रंग’ दिले… सुबोध भावे यांनी वाहिली श्रद्धांजली