‘रवीनाने मला नेहमीच…’ ही प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनची एक्स वहिनी, 15 वर्षांनी घटस्फोटावर सोडलं मौन
बॉलिवूडमधील अभिनेत्री जिने 90 च्या दशकात चित्रपट जगतावर राज्य केल. एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक मोठा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचे. ती अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. रवीना टंडनची आजही तेवढीच प्रसिद्ध आहे. तिची फॅनफॉलोईंगही तेवढीच जबरदस्त आहे. आता तर तिची मुलगी राशा थडानी हिनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
रवीनाची एक्स वहिनी आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री
पण,रवीना टंडनच्या वहिनीबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. तिची वहिनी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2004 मध्ये या अभिनेत्रीने रवीनाचा भाऊ राजीव टंडनशी लग्न केले होतं मात्र 2010 मध्ये ते वेगळे झाले. एका मुलाखतीदरम्यान या अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडमध्येही तेवढीच प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीही आहे. ती म्हणजे अभिनेत्री राखी विजन.
अभिनेत्रीने सांगितले राजीव टंडनसोबतच्या घटस्फोटाचे कारण
रवीनाची एक्स वहिनी अभिनेत्री राखी विजन आहे. एका मुलाखतीत राखी विजनने राजीव टंडनसोबतच्या घटस्फोटाचे कारण आणि रवीना टंडनसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे चर्चा केली. यासोबतच तिने मीडियापासून दूर का राहते हे देखील सांगितले. क्रिश 3 आणि गोलमाल रिटर्न्स सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या राखीने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.
अभिनेत्रीचे रवीनासोबतचे नाते कसे होते?
राखी विजनने संभाषणादरम्यान सांगितले की, ती माध्यमांपासून दूर राहते कारण राजीव टंडनसोबतच्या तिच्या घटस्फोटाचा उल्लेख अनेकदा केला जातो आणि त्यासोबत रवीना टंडनचे नावही त्यात ओढले जाते. तिने स्पष्ट केले की रवीनासोबतचे तिचे नाते खूप सुंदर आहे. दोघांमध्ये बहिणीसारखे प्रेम होते. त्यांनी एकत्र खूप मजा केली आणि प्रत्येक प्रसंगी एकमेकांना पाठिंबा दिला. दरम्यान, राखीने सांगितले की जेव्हा तिने राजीव टंडनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला तेव्हाही रवीना तिच्या पाठीशी उभी राहिली आणि तिला मदत केली.
‘मी ज्या व्यक्तीशी लग्न केलं होतं तो…’
राखीने सांगितले की, ‘मी ज्या व्यक्तीशी लग्न केले होते तो एक चांगला माणूस आहे. आम्ही ते यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण जेव्हा ते यशस्वी झाले नाही तेव्हा आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याचा रवीना टंडन, तिच्या आई किंवा वडिलांशी काहीही संबंध नाही. ही दोन व्यक्तींमधील बाब आहे. यामध्ये कोणताही वाद नाही”
घटस्फोटानंतर कामातून ब्रेक घेतला…
2022 मध्ये दिलेल्या अजून एका मुलाखतीत, राखी विजनने खुलासा केला होता की घटस्फोटानंतर तिने तिच्या कामातून ब्रेक घेतला होता, कारण तिला तिच्या तुटलेल्या लग्नातून सावरण्यासाठी थोडा वेळ हवा होता. तिने पुढे स्पष्ट केले की ती तिचा माजी पती राजीव आणि माजी मेहुणी रवीना यांच्या संपर्कात नाही. राखीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ती अनेक उत्तम चित्रपटांचा भाग राहिली आहे, परंतु तिला सर्वाधिक ओळख 1995 मध्ये ‘हम पाच’ या लोकप्रिय टीव्ही शोमधून मिळाली, ज्यामध्ये ती ‘स्वीटी’ची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List