पाकिस्तानी न्यूज अँकर्सची अदनान सामीने ‘थ्री इडियट्स’च्या डायलॉगने उडवली खिल्ली
प्रसिद्ध गायक अदनान सामीने भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया दिली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'चं त्याने समर्थन केलं असून पाकिस्तानी न्यूज अँकर्सला चांगलाच टोला लगावला आहे.
'ऑपरेशन सिंदूर'ची पोस्ट शेअर करत अदनानने 'जय हिंद' असं लिहिलंय आणि त्याचसोबत भारताच्या झेंड्याचा इमोजी पोस्ट केला आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या 14 दिवसांनंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
अदनानने पाकिस्तानी न्यूज अँकर्ससाठी उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. पाकिस्तानी न्यूज अँकर्सच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा एआय फोटो शेअर करत अदनानने लिहिलं, 'पाकिस्तानी टीव्ही न्यूज अँकर्स आता म्हणत असतील.. आल इज वेल!'
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List