हेमा मालिनी आजपर्यंत चढल्या नाहीत सवतीच्या घराची पायरी, लग्नाच्या 44 वर्षांनंतर धर्मेंद्र यांच्यापासून राहतात वेगळ्या
Hema Malini Personal Life: समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सर्वत्र खळबळ माजली. कारण धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि धर्मेंद्र चार मुलांचे वडील होते. धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न हेमा मालिनी यांच्या वडिलांना मान्य नव्हतं. पण समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं. पण लग्नानंतर धर्मेंद्र यांनी कधीच हेमा मालिनी यांनी मुख्य घरात नेलं नाही.
विवाहित असताना देखील धर्मेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी यांच्यासाठी खास स्थान होतं. अखेर समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.
पण लग्नानंतर हेमा मालिनी यांच्या मुख्य घरी गेल्या नाहीत. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास 40 वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही. 74 वर्षीय हेमा मालिनी यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये खुलासा केला की, ही परंपरा एकदा ईशा देओलने मोडली होती.
धर्मेंद्र यांनी भाऊ अजीत देओल यांची प्रकृती 2015 साली खालावली होती. त्यांची विचारपूस करण्यासाठी ईशा आणि अहाना दोघी प्रकाश कौर यांच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा अभिनेता सनी देओल सोबत आई प्रकाश कौर यांना ईशा पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा 87 वर्षीय धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये दोघांनी मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं. पण धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाच्या कोणत्याच कार्यक्रमा हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली नसतात. चाहत्यांमध्ये देओल कुटुंबामध्ये कायम चर्चा रंगलेल्या असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List