‘ऐ मोटी, आय लव यू यार..मुझसे शादी कर लो’, प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात होता हिंदू सुपरस्टार पण…
Love Life: बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. काही सेलिब्रिटींच्या लव्हस्टोरी चर्चेत राहिल्या काहींच्या मात्र सुरु होताच संपल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत. एक अशी अभिनेत्री जिच्या सौंदर्यावर असंख्य चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील फिदा होते. अभिनेत्री आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, आजही तिच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मुमताज आहे. बालकलाकार म्हणून मुमताज यांनी अभिनयाची सुरुवात केली. ‘सोने की चिड़िया’ हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. अभिनयाची सुरुवात केल्यानंतर मुमताज यांनी ‘गहरा दाग’ सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या बहिणीची भूमिका साकारली.
हळू-हळू सिनेविश्वात मुमताज हिचा बोलबाला वाढू लागला होता. अनेक सिनेमांमध्ये काम करत मुमताज यांनी हिंदी सिनेविश्व आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण एक वेळ अशी आली जेव्हा मुमताज यांच्यावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शकाचा जीव जडला. दिग्दर्शक दुसरे तिसरे कोणी नाही तर, यश चोप्रा होते.
सांगायचं झालं तर, मुमताज यांनी यश चोप्रा यांचे भाऊ बीआर चोप्रा यांच्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. या सिनेमांमध्ये यश चोप्रा यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिक बजावली. मुमताज यांच्या घरात यश चोप्रा यांचं येणं-जाणं देखील वाढलं होतं.
यश चोप्रा यांनी अनेकदा मुमताज यांनी लग्नासाठी विचारलं. पण मुमताज यांनी कधीच यश चोप्रा यांचं प्रेम स्वीकार केलं नाही. अखेर यश चोप्रा यांच्या निधनानंतर मुमताज यांनी मोठा खुलासा केला. एक मुलाखतीत मुमताज यांना विचारण्यात आलं की, ‘यश चोप्रा यांनी तुम्हाला प्रपोज केलं होतं?’
यावर मुमताज म्हणाल्या, ‘त्यांनी मला लग्नासाठी एकदा नाही तर 1000 वेळा विचारलं असेल. पण मी त्यांच्यावर कधी प्रेम केलंच नाही. प्रेम नसेल तर लग्न तरी कसं करणार. ते मला कायम म्हणायचे ऐ मोटी आय लव्ह यू यार… मुझसे शादी कर ले…’
पुढे मुमताज म्हणाल्या, ‘मी त्यांच्यावर प्रेम केलं पण फक्त दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून. त्यापेक्षा जास्त काहीही नाही. मी लंडनमध्ये असताना कायम त्यांचा फोन यायचा ते म्हणायचे माझा नवीन सिनेमा प्रदर्शित झाला आहे नक्की बघ… ते कायम मला सिनेमा पाहायला सांगायचे… आता ते या जगात नाही याचं फार दुःख होत…’ असं देखील मुमताज मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List