प्रिती झिंटाची मुलं कोणता धर्म पाळतात? अभिनेत्रीकडून खुलासा, म्हणाली “पती नास्तिक असला तरी..”
अभिनेत्री प्रिती झिंटा तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रितीने तिच्या मुलांच्या धर्माविषयी सांगितलं. आपली मुलं कोणता धर्म पाळतात, याचा खुलासा तिने केला आहे.
एक्स (ट्विटर) अकाऊंटवर चाहत्यांसोबत संवाद साधत असताना अभिनेत्री प्रिती झिंटाने तिच्या मुलांविषयीच्या प्रश्नाचं मोकळेपणे उत्तर दिलं. प्रितीने 2016 मध्ये जिन गुडइनफशी लग्न केलं. 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून ती जुळ्या मुलांची आई बनली.
एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना तिची मुलं कोणत्या धर्माचं पालन करतात हे प्रितीने स्पष्ट केलं. तिने लिहिलं, 'मला माफ करा, पण मी यावर अचानकपणे बोलतेय. या प्रश्नामुळे मला PTSD चा (Post-Traumatic Stress Disorder, मनावर आघात करणारी एखादी घटना घडल्यानंतर निर्माण झालेला तणाव) त्रास होतो. आई बनल्यानंतर आणि परदेशात राहिल्यानंतर मी याची खात्री करते की माझ्या मुलांनी विसरू नये की ते अर्धे भारतीय आहेत.'
'माझा पती नास्तिक असल्याने आम्ही मुलांना हिंदू संस्कृतीविषयी शिकवतोय. दुर्दैवाने मला सतत टीकेचा सामना करावा लागतोय आणि प्रत्येकवेळी माझ्या निवडीचं राजकारण करून माझ्याकडून हा छोटा आनंद हिरावून घेतला जातो. मला असं वाटतंय की मी कोण आहे याबद्दल किंवा माझ्या मुलांना त्यांच्या धर्माबद्दल शिकवण्यात अभिमान आहे याबद्दल सतत उत्तर देत राहावं लागेल', असं तिने पुढे म्हटलंय.
प्रिती झिंटा राजकारणात पाऊल ठेवणार असून ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावरही तिने सडेतोड उत्तर दिलंय. 'सोशल मीडियावरील लोकांची हीच समस्या आहे, प्रत्येकजण इतरांबद्दल फक्त मनं बनवू लागला आहे. मंदिरात जाणं, महाकुंभला जाणं आणि मी कोण आहे, माझी ओळख काय आहे याबद्दल अभिमान बाळगणं यांचा अर्थ असा होत नाही की मी राजकारणात किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे', असं तिने स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List