‘ती माझ्यासाठी अभिनेत्री नाही तर…’ माधुरीसोबत लग्न करण्याच्या निर्णयावर डॉ. नेने स्पष्टच म्हणाले
धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती 90 च्या दशकापासून आणि आजही चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. ती नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहते. माधुरीची फॅनफॉलोईंग जबरदस्त आहे. ती तिच्या चित्रपटांपमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही तेवढीच चर्चेत असते. याचं कारण म्हणजे माधुरी आणि श्रीराम नेने यांचं लग्न. या दोघांचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली आहेत. या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना 1999 मध्ये लग्न केले आणि ती अमेरिकेत राहायला गेली.
माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने नेहमीच चर्चेत असतात
माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांचा विवाहसोहळा 1999 मध्ये अमेरिकेत पार पडला होता. तेव्हा नक्कीच माधुरीचे जवळपास बॉलिवूडवर राज्य होते. त्यामुळे तिच्या लग्नानंतरही तिची फॅन फॉलोईंग कमी झाली नव्हती. त्यामुळे एका मुलाखतीत तिचे पती डॉक्टर नेने यांना आवर्जून हा प्रश्न विचारण्यात आला की बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्रीशी लग्न केल्यावर आयुष्य कसं बदललं? त्यावर त्यांनी अगदी थेट उत्तर देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
माधुरी आणि त्यांच्यां नात्याबद्दल काय सांगितलं
माधुरीचे पती डॉ. नेने यांनी काही महिन्यांपूर्वी रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी प्रोफेशनल व वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टींबाबत खुलासा केला.त्यावेळी त्यांनी माधुरी आणि त्यांच्यां नात्याबद्दल तसेच त्यांच्या लग्नाबद्दलचाही खुलासा केला होता.
माधुरी दीक्षितसोबत लग्न झाल्यावर आयुष्य कसं बदललं? याविषयी सांगताना डॉ. नेने म्हणाले, “भारतात काय अमेरिकेत सुद्धा अशीच परिस्थिती होती. कारण, तिला सर्वत्र ओळखलं जायचं. पण, मी कधीच तिच्याकडे एक अभिनेत्री म्हणून पाहिलं नाही कारण, ती माझी पत्नी आहे, माझी जोडीदार आहे.”
माधुरीसोबत लग्न केल्यानंतर काय जाणवलं?
डॉ. नेने पुढे म्हणाले “माधुरी अभिनेत्री ही सर्वांसाठी आहे पण, माझ्यासाठी ती माझी जोडीदार आणि माझी पत्नी आहे. लग्नानंतर आपला जोडीदार हा खूप महत्त्वाचा असतो. कारण, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आपण एकमेकांना साथ देणं गरजेचं असतं. मला तिचा भूतकाळ माहिती नाही आणि तिलाही माझ्या भूतकाळाबाबत काहीच माहीत नव्हतं. आमच्या दोघांचं प्रोफेशन सुद्धा खूप वेगळं आहे. पण, आमची कौटुंबिक पार्श्वभूमी सारखीच होती. आम्ही दोघंही महाराष्ट्रातले त्यात आमची मातृभाषा एकच आहे. शेवटी आपल्याला समजून घेणारा जोडीदार भेटला तर, आयुष्यात खूप गोष्टी सोप्या होतात.” असं म्हणत त्यांनी माधुरीसोबत लग्न करण्याबाबत सांगितलं.
माधुरी एक जोडीदार म्हणून कशी आहे?
पुढे त्यांनी माधुरी एक जोडीदार म्हणून कशी आहे त्याबद्दल सांगितल, ते म्हणाले की, “माधुरी खूप जास्त विनम्र आहे. ती तिच्या सगळ्या चाहत्यांशी प्रेमाने वागते. प्रत्येकाचा आदर करते. मला तिचा हा स्वभाव फार आवडतो. जेव्हा आपण अभिनय क्षेत्रात काम करत असतो तेव्हा, वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला सामान्य लोकांसारखं वागता आलं पाहिजे. अमेरिकेत आम्हाला सहज फिरता यायचं पण, भारतात हे शक्य नाही.” असही डॉ. नेने म्हणाले.
अमेरिका की भारत कुठे जास्त राहण्यात आनंद?
अमेरिका सोडून भारतात परतल्यावर जास्त आनंदी आहात का? असं प्रश्न विचारल्यावर नेने म्हणाले, “मी इथे जास्त आनंदी आहे असं म्हणू शकत नाही कारण, अमेरिकेत सहज वावरता यायचं. कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, तिथे सगळीच लोक आम्हाला ओळखत नव्हती. पण, भारतात असं नाहीये. आपल्या देशात माधुरीमुळे मलाही सगळे ओळखतात.इथे सगळी आपली लोक आहेत आणि भारतीय संस्कृती सर्वात छान आहे.” असं म्हणत त्यांनी माधुरीसोबत लग्नानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलले त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List