शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाच्या कारला अपघात, पती-पत्नी ठार तर पाच जण गंभीर जखमी

शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाच्या कारला अपघात, पती-पत्नी ठार तर पाच जण गंभीर जखमी

हैद्राबाद येथुन छत्रपती संभाजीनगर यामार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असताना विरुद्ध दिशेने मुरुमाचा उभ्या हायवाला कारची जोराची धडक बसल्याने या भीषण अपघातात पती -पत्नी जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री साडे अकराच्या दरम्यान जालन्यातील धुळे -सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथे घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, जेसीबीच्या सहाय्याने गाडी कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

हैदराबादहून शिर्डी देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घातला असून या अपघातात जी रामू (45),जी माधुरी (40) दोघेही रा. हैदराबाद जागीच ठार झाले असून श्रीवाणी (41), अनुषा (17), मेघना (12), ऋषिका (7), नागेश्वर राव (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हैदराबाद येथील कुटुंबातील 7 जण शिर्डी येथे दर्शन करण्यासाठी किया कॅरेन्स गाडीने रविवारी दुपारी 12 वाजता निघाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;