जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका 24 वर्षीय तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला असल्याची घटना आज 12 मे रोजी घडली. विठ्ठल गंगाधर कावळे असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. भाटेपुरी येथील शेतकरी विठ्ठल कावळे हा शेतात मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी गेला होता. मात्र अचानक दोन वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटांसह वादळी वारा आणि पाऊस सुरु झाला. त्याचवेळी अंगावर वीज कोसळून विठ्ठलचा शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. गावकर्‍यांनी त्याला तात्काळ जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले याची माहिती कळताच मृतदेह प्रशासनाने शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला असून भाटेपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;