न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेली ‘ती’ महिला कोण?

न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेली ‘ती’ महिला कोण?

सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री साडे आठच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. आता या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. वळसंगकर यांचे सुपुत्र डॉ. अश्विन शिरीष वळसंगकर (वय. – 45, राहणार – एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटल, मोदी रेल्वे क्रॉसिंग, सोलापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मनीषा मुसळे-माने यांच्या नावाचा उल्लेख असून त्यांच्यामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी न्यायालयाची परवानगी घेऊन रात्रीच आरोपी महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे तक्रार?

डॉ. वळसंगकर यांनी आरोपी महिलेला वेळोवेळी सहकार्य करूनही त्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले. एवढेच नाही तर धमकीही दिली. या आरोपांना कंटाळून डॉ. वळसंगकर यांनी स्वत:च्या बेडरुमला अटॅच असलेल्या बाथरुममध्ये परवाना असलेल्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आरोपी महिला वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार डॉ. अश्विन शिरीळ वळसंगकर यांनी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत न्यायालयाच्या परवानगीने महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेची कसून चौकशी सुरू असून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात