शॉवरखाली अंघोळ नको; आठवड्यातून एकदाच कपडे धुवा ! पाणी बचतीसाठी ठाणे महापालिकेचा फॉर्म्युला

शॉवरखाली अंघोळ नको; आठवड्यातून एकदाच कपडे धुवा ! पाणी बचतीसाठी ठाणे महापालिकेचा फॉर्म्युला

पाणीटंचाईचे चटके आता स्मार्ट सिटी असा उल्लेख होणाऱ्या ठाणे शहरालाही बसू लागले आहेत. शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे गेली असून पाणीपुरवठा अत्यंत अपुरा पडतो. त्यातच आता कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक भागात टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. सध्या मिळत असलेले पाणी नागरिकांनी योग्य प्रकारे व जपून वापरण्यासाठी खास फॉर्म्युला तयार केला आहे. पाण्याची बचत करण्याबरोबरच शॉवरखाली अंघोळ करू नका तसेच आठवड्यातून एकदाच कपडे धुवा अशा विविध प्रकारच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.

ठाणेकरांना स्टेम, एमआयडीसी, मुंबई महापालिका अशा विविध स्रोतांमार्फत रोज 585 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो, पण हे पाणी सध्याच्या उन्हाळ्यामुळे कमी पडत आहे. एकीकडे धरणातील पाणी कमी होत असून विहिरी व कूपनलिकांमधील पाण्याची पातळीदेखील घसरली आहे. टंचाई निर्माण झाली असूनही अनेक नागरिक बेफिकीरपणे पाण्याचा वापर करतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रहिवाशांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

… तर सोसायटीचे कनेक्शन कापणार
ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक सोसायट्या आहेत. अनेकदा इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. यासंदर्भात आवश्यक असलेली दुरुस्ती सोसायटीने करून घ्यावी. पाणी वाया जात असल्याची तक्रार पालिकेकडे आली तर संबंधित सोसायटीचे नळ कनेक्शनच कापण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या आहेत सूचना

  • गाड्या न धुता बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून ओल्या कपड्याने त्या पुसाव्यात.
  • नळ सुरू ठेवून कपडे धुणे, भांडी घासणे, दाढी करणे अशा गोष्टी टाळाव्यात.
  • घरातील नळांची तपासणी करून लिकेज असल्यास तातडीने दुरुस्ती करा.
  • स्वच्छतागृहामध्ये डबल फ्लॅशचा वापर. तरणतलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नका.
  • आठवड्याचे कपडे एकाच दिवशी धुवा.
  • कपडे धुतल्यानंतरचे पाणी बाथरूम, फरशी पुसणे, गाड्या धुणे, बगीचा आदींसाठी वापरा
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे...
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदचा लाहोरमधील सिक्रेट ठिकाणा उघड!