सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. व्हिडीओ तयार करून आरोपींकडून सलमान खानला धमकी देण्यात आलीये. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही धमकी सलमान खान याला देण्यात आलीये. गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. हेच नाही तर 14 एप्रिलला सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. जेंव्हा हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. काही तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतले.
आता युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून सलमानला मारण्याची धमकी देण्यात आलीये. या व्हिडीओनंतर पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतल्याचे देखील कळतंय. बिश्नोई गॅंगच्या नावाने या व्हिडीओमध्ये धमकी देण्यात आली होती. राजस्थान येथून या आरोपीला अटक करण्यात आलीये.
बनवारीलाल गुजर वय 25 असे या आरोपीचे नाव आहे. युट्युबवरील धमकीचा व्हिडिओसमोर येताच गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आली. सलमान खान कुठे जातो याची व्हिडिओत बतावणी करत सलमानला मारण्याची धमकी देण्यात आली होती. व्हिडिओत लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख देखीस करण्यात आला.
आरोपीला अटक करून काही वेळातच गुन्हे शाखेचे पथक मुंबईत दाखल होणार आहे. पोलिस या प्रकरणातील अजून चाैकशी करत आहेत. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आलीये.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले होते. हेच नाही तर सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी यापूर्वीच त्याच्या पनवेलच्या घराची अनेकदा रेकी केल्याचीही माहिती पुढे आली.
लॉरेन्स बिश्नोई याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मी अजून गँगस्टरच झालो नाहीये. माझ्या आयुष्यात एकच ध्येय आहे की, ते म्हणजे सलमान खान याला जीवे मारण्याचे. ज्यादिवशी हे पूर्ण होईल, त्यादिवशी मी खऱ्या अर्थाने गँगस्टर होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List