माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार 

बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील कचरा स्थानांतर केंद्राला विरोध; अतिश बारणे व कविता अल्हाट यांचे साकडे 

माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार 

बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे.

पिंपरी :  बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे. तसेच रिव्हर रेसिडेन्सी येथील रद्द करण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प त्याच्याच खाली २०० मीटर वर सुरू असून त्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यातच आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी दोन कचरा स्थानांतर केंद्र करण्यात येणार आहेत. जुना प्रभाग क्रमांक २, ६, ८ व ९ यापैकी बोऱ्हाडेवाडी येथेच एक

कचरा स्थानांतर केंद्र उद्यानाची जागा आरक्षित असताना त्याच जागेवर हे केंद्र उभा करण्यात येत असल्याने नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश बारणे व महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली शिषटमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना दूरध्वनी वरून संपर्क साधत माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका असा सज्जड दम देत कोणते ही काम विचार विनिमायानी करा असे आदेश दिले आहेत. 

मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर शिष्टमंडळ भेटल्यानंतर सोसायटी धारकांच्या प्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, उपाध्यक्ष अतिश बारणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, नगरसेवक वसंत बोराटे, चिखली मोशी फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने, विशाल आहिरे, अश्विनी सस्ते, जीवन सस्ते काशिनाथ धरी, उमेश उगीले, विनोद शिर्के यांनी आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेतली. 

तसेच २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १/१३७ येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज्य, क्रिस्टल, ऐश्नावर्यम हमारा, शुभयोग, प्रिस्तींन ग्रीन, सिल्व्हर ९ सोसायटीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. परंतु महापालिका प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंग साठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यासंदर्भात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांनी सराव व खेळ कोठे खेळायचे असा सवाल आयुक सिंग यांना केला आहे. 

आपण काही निर्णय एकतर्फी घेत आहात. यापुढे असे चालणार नाही. नागरिकांच्या दृष्टीने व त्यांचा विचार करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे. यापुढे कोणतेही निर्णय मला विचारल्याशिवाय घ्यायचे नाहीत, मी महापालिकेमध्ये मीटिंग घेणार आहे. त्यावेळी नागरिकांच्या, शहरवासीयांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. फक्त कोणी तरी सांगत आहे म्हणून जर आपण काही निर्णय घेत असाल तर ते थांबवा. माझ्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रश्न मांडले तर त्यावर ही विचार करा, तुम्हाला माझी काम करण्याची पद्धत माहीत आहे, कोणते ही निर्णय यापुढे एकतर्फी झाले नाही पाहिजेत असा सज्जड दम अजित पवार यांनी आयुक्त शेखर सिंग यांना दिला. 

Ajit Pawar
अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत  उत्साह... 

महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे बहुतांशी भाजपाच्या आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची चलती आहे. परंतु राज्यातील राजकारणात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे गट एकत्रित आल्यामुळे महापालिकेतील ही राजकारण बदलले आहे. भाजपा बरोबरच अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मांडलेल्या प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्या असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यापुढे कोणतेही निर्णय नागरिकांच्या विरोधात कोण तरी सांगत आहे म्हणून घेऊ नका असे खुद्द आयुक्तांना आदेश दिले असल्याने अजित पवार यांच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

हॉर्स रायडिंग ऐवजी क्रीडांगण करा

तसेच २४ मीटर रस्त्यावरील मोकळे मैदान आरक्षण १/१३७ येथे हॉर्स रायडिंग साठी विकसित करण्यात येणार आहे. त्याला ही परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज्य, क्रिस्टल, ऐश्नावर्यम हमारा, शुभयोग, प्रिस्तींन ग्रीन, सिल्व्हर ९ सोसायटीतील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. जुना प्रभाग क्रमांक दोन येथे मैदान नसल्याने परिसरातील खेळाडू या मैदानावर सराव करीत आहेत. तसेच या ठिकाणी ओपन जिम असल्याने परिसरातील नागरीक व महिला व्यायामासाठी वापर करत होते. परंतु महापालिका प्रशासनाने याठिकाणी हॉर्स रायडिंग साठी जागा आरक्षित केल्यामुळे परिसरातील मुलांनी खेळण्यासाठी खासगी व्यवसायिकाकडे पैसे मोजून खेळायचे का असा सवाल ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यासंदर्भात ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलांनी सराव व खेळ कोठे खेळायचे असा सवाल आयुक सिंग यांना केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;