जुहू समुद्रकिनारा झाला चकाचक, स्वच्छतेसाठी 400 तरुणांचा सहभाग, 1946 किलो प्लॅस्टिक कचरा केला गोळा
मुंबईला नैसर्गिकरीत्या लाभलेल्या सागरी किनाऱ्यांचे संवर्धन व्हावे म्हणून 400 हून अधिक युवक, नागरिक आणि मुलांनी आज सकाळी जुहू चौपाटी येथे स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी तब्बल 1946 किलो प्लॅस्टिक कचरा गोळा केला. हा कचरा पुनर्प्रक्रिया करून सार्वजनिक सोयींसाठी वापरला जाणार आहे.
‘जल्लोषः क्लीन कोस्ट्स, रिस्टोअर द शोर’ ही मोहीम प्रोजेक्ट मुंबई, युनिसेफ इंडिया आणि युवाहच्या ग्रीन रायझिंग उपक्रमाच्या माध्यमातून राबवली गेली. बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाचे राज्य हवामान कृती कक्ष, माझी वसुंधरा, एनएसएस, नाईन इज माईन आणि महाराष्ट्र यूथ फॉर क्लायमेट अॅक्शन या संस्थांचाही मोहीमेला पाठिंबा होता. ही मोहीम फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱया मुंबई क्लायमेट वीकसाठीचा आरंभिक टप्पा आहे. या कार्यक्रमात मुंबईतील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, युवाह इंडियाचे प्रमुख जॉर्जिया व्हॅरिस्को, युनिसेफ मुंबईचे वॉश-सीसीईएस तज्ञ युसूफ कबीर, माझी वसुंधराचे मिशन डायरेक्टर सुधाकर बोबडे, अभिनेत्री अनुरिता झा आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List