‘एशियाटिक’चे नवीन सभासद ओळखपत्राच्या प्रतीक्षेत; हजारभर नवे अर्ज, प्रक्रिया पूर्ण कधी होणार?

‘एशियाटिक’चे नवीन सभासद ओळखपत्राच्या प्रतीक्षेत; हजारभर नवे अर्ज, प्रक्रिया पूर्ण कधी होणार?

एक शतकाहून अधिक काळ मुंबईच्या साहित्य-सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या एशियाटिक सोसायटीची निवडणूक येत्या 8 नोव्हेंबर रोजी आहे. सदस्यत्वासाठीच्या आलेल्या एकगठ्ठा अर्जामुळे ही निवडणूक गाजतेय. हजारभर नवे अर्ज संस्थेकडे आले आहेत. या नव्या सभासदांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करून फी भरून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. ओळखपत्र मिळाले तरच त्यांना मतदान करता येणार आहे. निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असल्याने ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल आहे.

एशियाटिक सोसायटीकडे एरव्ही दर महिन्याला 20 ते 25 नवे अर्ज येतात. मात्र  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकगठ्ठा अर्ज यायला लागले. त्यावरून वाद सुरू झाला. ‘एशियाटिक’सारखी प्रतिष्ठत संस्था ताब्यात घेण्याचा डाव असल्याचा आरोप-प्रत्योराप होतोय. अशातच 27 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मंजूर झालेल्यांना निवडणुकीत मतदान करता येईल असे ठरले. त्यानुसार आता इच्छुक सदस्यांना कार्यालयाकडून शुल्क भरण्यासंदर्भात संपर्प साधण्यास सुरुवात झाली आहे.

n ओळखपत्र मिळाले नसेल आणि त्यांना 8 नोव्हेंबरला मतदानाचा अधिकार मिळवायचे असल्यास त्यांनी स्वतःहून संस्थेमध्ये विचारणा करावी आणि ओळखपत्र प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.

n एशियाटिक सोसायटीकडे सुमारे 3500 सदस्य आहेत. त्यात आणखी सुमारे 1600 नवे अर्ज आलेले आहेत. त्यातील 200 ते 250 अर्ज अपूर्ण असल्याने बाजूला काढण्यात आल्याचे समजते .

n एशियाटिक सोसायटीत अध्यक्ष, चार उपाध्यक्ष, मानद सचिव आणि पाच व्यवस्थापन समिती सदस्य या पदांसाठी निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ पत्रकार पुमार केतकर आणि डॉ. विवेक सहस्रबुद्धे यांनी अर्ज भरला आहे.

अर्जदार डोळे लावून बसलेत

15 ऑक्टोबरपर्यंत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केलेले लोक  एशियाटिक सोसायटीकडून ई–मेल किंवा  मेसेज येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अर्ज पडताळणी समितीने काही सदस्यांना एशियाटिकमध्ये बोलावून त्यांची मुलाखत घेऊन 10 ते 15 दिवस झाले असले तरी अद्याप सदस्यत्व मिळालेले नाही, असे समजते. जरी नव्या अर्जदारांना 30 ऑक्टोबरपर्यंत सदस्यत्व मान्य झाल्याचे कळले तरी फी भरणे, ओळखपत्र घेणे हे सोपस्कार अजून पार करावे लागतील. त्यामुळे हजारभर अर्जदार एशियाटिककडे डोळे लावून बसले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान...
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप
IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान