मतांसाठी मोदी काहीही करू शकतात, नाचूही शकतात! राहुल गांधी यांची बोचरी टीका

मतांसाठी मोदी काहीही करू शकतात, नाचूही शकतात! राहुल गांधी यांची बोचरी टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘नरेंद्र मोदी हे मतं मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. तुम्ही नाचायला सांगितलं तर ते स्टेजवर नाचूही शकतात,’ अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. राहुल यांनी यावेळी मोदींवर जोरदार तोफ डागली. ‘मोदींनी प्रत्येक गोष्टीचा ड्रामा करून टाकलाय. यमुनेत स्नान करणार असं सांगून ते स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करतात. त्यांना यमुना नदीशी काही देणंघेणं नाही. छठपूजेशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांना फक्त मतं पाहिजेत. त्यासाठी ते काहीही करतील. तुम्ही त्यांना सांगा की, आम्ही तुम्हाला मत देतो, भाषण करू नका, स्टेजवर येऊन नाचून दाखवा, तर ते नाचूनही दाखवतील, असे राहुल गांधी म्हणाले.

नितीश कुमार केवळ मुखवटा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही त्यांनी तोफ डागली. ‘नितीश हे केवळ सरकारचा मुखवटा आहेत. रिमोट पंट्रोल भाजपच्या हाती आहे. बिहारचा खरा कारभार तीन-चार लोक चालवत आहेत. त्यांना सामाजिक न्यायाशी काही देणेघेणे नाही. त्यामुळेच जात जनगणनेवर मोदी चकार शब्द बोलत नाहीत, असा आरोप राहुल यांनी केला.

मोदी ट्रम्पना घाबरतात!

‘नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात. ट्रम्प रोजच्या रोज वेगवेगळय़ा देशात जाऊन मोदींचा अपमान करतात. मोदींना दम देऊन मी ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवल्याचे सांगतात, पण मोदींच्या तोंडातून एक शब्द फुटत नाही. ट्रम्प खोटे बोलताहेत असे ते बोलायलाच तयार नाहीत,’ असे राहुल म्हणाले.

फक्त सूटबूटवाल्यांसोबत दिसतील!

‘मोदींकडून जे काही करून घ्यायचं आहे ते निवडणुकीआधीच करून घ्या, नंतर ते तुम्हाला दिसणारही नाहीत. निवडणुकीनंतर ते फक्त अंबानींच्या लग्नात दिसतील. सूटबूटवाल्यांसोबत दिसतील. शेतकरी आणि मजुरांसोबत दिसणार नाहीत,’ असा सणसणीत टोला राहुल यांनी हाणला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी करतात असा घणाघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. तसेच मत चोरी म्हणजे सामान्य मतदाराचा अपमान...
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप
IND Vs AUS – ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला, टीम इंडियाला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी 339 धावांचं आव्हान