मोठी बातमी ! कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले, मतदान केंद्रात घुसून तरुणाचा धुडगूस; नांदेडमधील धक्कादायक घटना

मोठी बातमी ! कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले, मतदान केंद्रात घुसून तरुणाचा धुडगूस; नांदेडमधील धक्कादायक घटना

राज्यभरात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. मात्र, हे मतदान पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाहीये. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना चिंता लागली आहे. मतदार घराबाहेर पडले नसल्याचं चित्र आहे. मात्र, असं असतानाच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची कुऱ्हाडीने तोडफोड केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या तोडफोडीची घटना घडल्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण पसरलं. मतदान केंद्रावर मतदानही थांबवण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका शाळेच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. आज सकाळी या मतदान केंद्रावर सुरळीत आणि शांततेत मतदान सुरू होतं. लोकांनी मतदानासाठी रांगाही लावल्या होत्या. पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, दुपारी अचानक एक तरुण मतदान केंद्रात घुसला आणि अचानक त्याने छोट्या कुऱ्हाडीने मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनवर प्रहार करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने मतदान केंद्रावरील मतदार आणि अधिकारी भयभीत झाले. मतदारांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर अधिकाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुणालाही बधला नाही.

अन् पोलिसांनी ताब्यात घेतलं

या तरुणाने छोट्या कुऱ्हाडीने मशीनवर एकामागोमाग एक प्रहार करणं सुरू ठेवलं. त्यामुळे मशीनची तोडफोड झाली. दोन मशीन, कागदपत्रे खाली पडली. सर्व सामान अस्तव्यस्त पडलं. मशीनची तोडफोड सुरू असल्याची माहिती मिळताच मतदान केंद्रावरील पोलिसांनी तात्काळ मतदान केंद्रात धाव घेतली आणि मशीनची तोडफोड करणाऱ्या तरुणाला अटक केली. भय्यासाहेब एडके असं या तरुणाचं नाव आहे. त्याने या मशीन का फोडल्या? या मागे कुणाचा हात आहे काय? तो कुठल्या पक्षाशी संबंधित आहे काय? तो राहतो कुठे? काय करतो? याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्याने ही कुऱ्हाड लपवून आणली होती असं सांगितलं जातं.

मशीन तात्काळ बदलल्या

दरम्यान, रामतीर्थ मधल्या एका मतदानकेंद्रावर एका तरुणाने एव्हीएम फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मशिनचा बाह्य भाग जरी डॅमेज झाला असला तरी केलेल्या मतदानाची आकडेवारीचा डाटा सुरक्षित आहे. पोलिसांनी सबंधित तरुणला अटक केलेली आहे. योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी मशीन बदलण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

संविधान वाचवण्यासाठी…

संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचं संबंधित तरुण ओरडत असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट फोडले असले तरी कंट्रोल युनिट सुरक्षित आहे. त्यामुळे झालेल्या मतदानाला कोणताही धोका नाही. प्रशासनाने तात्काळ व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम बदलले असून मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे, अशी माहिती नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने.. ‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
नुकताच एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफरचे निधन झाले...
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन
आंबेगाव तालुक्यातील डिंभे कालव्यावरचा पूल कोसळला
4 जूनला जनताच तुमचा करेक्ट कार्यक्रम करेल! उद्धव ठाकरे मिंध्यांवर कडाडले
मोदीजी एक काम करा, सीबीआय ईडीला अदानी अंबानींकडे पाठवा; राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक