माझं एक काम करा, घरोघरी जा आणि सांगा मोदीजी कोल्हापुरात… पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

माझं एक काम करा, घरोघरी जा आणि सांगा मोदीजी कोल्हापुरात… पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जोरदार सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या मतदारांना आवाहनही केलं. माझं एक काम करा. घरोघरी जा. सांगा मोदी कोल्हापुरात आले होते. मोदींनी नमस्कार सांगितला म्हणून सांगा. त्यांना निरोप द्या त्यांचे आशीर्वाद मिळेल. तुमचं स्वप्न हेच माझं स्वप्न आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आहे. माझा प्रत्येक क्षण देशासाठी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी त्यांनी अत्यंत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. कोल्हापूरकर फुटबॉल प्रेमी आहेत. जगात भारी कोल्हापुरी, हे संपूर्ण देश जाणतो. त्यामुळे आता तुम्हाला गोल करायचा आहे. असा गोल करा की पुढचे सर्व गोल सोपे गेले पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

कुणात हिंमत आहे का?

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. सरकारमध्ये आल्यानंतर काँग्रेस काश्मीरमध्ये आर्टिकल 370 परत बहाल करणार आहे. तसा काँग्रेसचा अजेंडा आहे. मोदींचा हा निर्णय मागे घेण्याची कुणात हिंमत आहे का? ते असं करायला गेले तर त्यांची काय अवस्था होईल त्यांना माहीत नाही का? ज्यांचे तीन आकडी संख्येत उमेदवार निवडून येत नाही. ते इंडिया आघाडीवाले सरकारच्या दरवाज्यापर्यंत येऊ शकतात का? एक वर्षात एक पीएम असा नियम ते करणार आहे. म्हणजे पाच वर्षात पाच पंतप्रधान करणार आहेत. त्यांना सवय झाली आहे, अशी टीका त्यांनी काँगेसवर केली.

कर्नाटक मॉडेल आणण्याचा डाव

यावेळी त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोपही केला. काँग्रेसचा कर्नाटक मॉडेल आणण्याचा डाव आहे. कर्नाटकात रातोरात मुसलामानांना ओबीसी करून त्यांना आरक्षण दिलं. त्यामुळे काँग्रेसची एक जागाही निवडून येता कामा नये, असं आवाहन मोदी यांनी केलं.

बाळासाहेब असते तर…

शिवाजी महाराजांच्या धरतीवर औरंगजेबांना मानणाऱ्यांना ते भेटले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांच्या मनाला वेदना झाल्या असत्या. ही नकली शिवसेना आहे, असा टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;