Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्रात सर्वात कमी टक्के मतदान, महाराष्ट्राच्या जनतेला झालं तरी काय?

Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्रात सर्वात कमी टक्के मतदान, महाराष्ट्राच्या जनतेला झालं तरी काय?

महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. पण या पुरोगामी महाराष्ट्रात यंदा सर्वात कमी मतदान होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रतील एकूण 8 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडत आहे. या मतदारसंघांमघ्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. पण फक्त नेतेमंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपुरताच हा मतदानाचा उत्साह बघायला मिळतोय. कारण बहुतेक नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्क बजवायला हवा, तो त्याचा अधिकार आहे. पण आता नागरीक मतदानाकडे कानाडोळा करताना दिसत आहे. महाराष्ट्रात आज पार पडत असलेल्या मतदानाची आकडेवारी धक्कादायक आहे. कारण संपूर्ण देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वात कमी टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ 43.01 टक्के मतदान झालं आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं आहे. परभणीत 44.49 टक्के मतदान झालं आहे. अकोल्यात 42.69 टक्के मतदान झालं आहे. वर्धा मतदारसंघात 45.95 टक्के मतदान झालं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात 43.76 टक्के मतदान झालं आहे. तर बुलढाण्यात 41.66 टक्के मतदान पार पडलं आहे. हिंगोलीत 40.50 टक्के मतदान झालं आहे. तसेच नांदेडमध्ये 42.42 टक्के मतदान झालं आहे. यवतमाळ-वाशिममध्ये 42.55 टक्के मतदान झालंय. देशात सर्वाधिक मतदान हे त्रिपुरा राज्यात झालं आहे. त्रिपुरा राज्यात 68.92 टक्के मतदान झालं आहे.

देशात इतर राज्यांमध्ये किती टक्के मतदान?

देशात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. केरळमध्ये 20, कर्नाटकमध्ये 14, राजस्थानमध्ये 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 3, त्रिपुरामध्ये 1 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 2 जागांवर मतदान पार पडत आहे.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. त्रिपुरामध्ये सर्वाधिक 68.92 टक्के मतदान झालं आहे. तर आसाममध्ये 60.32 टक्के, बिहारमध्ये 44.24 टक्के, छत्तीसगडमध्ये 63.92 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 57.76 टक्के, कर्नाटकमध्ये 50.93 टक्के, केरळमध्ये 51.64 टक्के, मध्य प्रदेशात 46.50 टक्के, राजस्थानात 50.27 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 60.60 टक्के आणि महाराष्ट्रात 43.01 टक्के मतदान झालं आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला झालं तरी काय?

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रात पक्षफोडीचं राजकारण बघायला मिळालं आहे. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपची महायुती होऊ शकली नाही. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मैत्री झाली आणि त्यांच्या निर्माण झालेला आघाडीला महाविकास आघाडी असं नाव ठेवण्यात आलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण हे सरकार केवळ अडीच वर्ष टिकलं. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत सर्वात मोठं बंड पुकारलं. एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केलं. त्यानंतर वर्षभरात राष्ट्ववादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सत्तेत सहभाही झाला. या फोडाफोडीचा राजकारणामुळे जनता देखील कंटाळल्याची चर्चा आहे. पण मतदान न करणं हा यावरील मार्ग नाही. याउलट जनेतेने मतदानातून योग्य उमेदवाराला निवडून देऊन जनमत काय आहे? हे दाखवून देणं अपेक्षित आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे...
मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन