बारामतीच झालं, आता शिरूरला जायचं! : अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंचं टेंशन..!

बारामतीच झालं, आता शिरूरला जायचं! : अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंचं टेंशन..!

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. 

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगला आहे. महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनिता पवार या मैदानात आहेत. आज बारामती मध्ये पार पडलेल्या प्रचार सांगता सभेला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केल्याचा पाहायला मिळाल. सुरेंद्र पवार यांच्यासाठी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी आता बारामतीचं मतदान पार पडल्यानंतर शिरूर मध्ये सर्वांनी जायचंय, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यामध्ये लढत होत आहे. येथे महाविकास आघाडी कडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात आहेत. कोल्हे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार येथून मैदानात उतरवायला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश नेते इकडेच दिसून आले. मात्र आता अजित पवारांनी शिरूरमध्ये सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केल्याने अमोल कोल्हे यांचे टेन्शन वाढणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

मी विकासावर बोलतो रडीचा डाव खेळत नाही

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत असताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला. हाच धागा पकडत अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला. "मी सुरुवातीपासून कार्यकर्त्यांना सांगत होतो की शेवटच्या सभेमध्ये रडीचा डाव खेळला जाईल. आज आमचा पट्टा रडला मात्र मी विकास कामांवर मत मागतो भावनिक राजकारण करत नाही", अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;