‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार

‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

पुणे : राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

आळंदी येथे शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार बोलत होते. यावेळी संवाद मेळाव्यास महायुतीचे घटक मित्र पक्षांचे पदाधिकारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

“तीर्थक्षेत्र देहू आळंदीच्या विकासाबरोबर पालखी महामार्गाची विकासकामे मार्गी लावली आत येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली जाईल. ही देशाची निवडणूक असल्याचे आढळराव पाटील यांना निवडून द्या, येथील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल”, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.

“आपण कोणत्याही प्रकारच्या शूटिंगला जाणार नाही. त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी तसेच मतदार संघातील उर्वरित विकास कामासाठी देणार आहे. आळंदी येथील देवस्थानच्या जागेत विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लागेल. पुणे मेट्रो आळंदीपर्यंत आणण्यास प्रयत्न करायचे आहेत. मी मतदारसंघासाठी पूर्ण वेळ काम करणारा माणूस आहे, यामुळे निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही भूलथापांना  बळी पडू नये”, असे आवाहन आढळराव पाटलांनी मतदारांना केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;