“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट

“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट

पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बैंक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

पुणे : पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बैंक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

मेळाव्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट,  राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुक ही देशाची निवडणूक आहे. ती गावकी भावकीची निवडणूक नाही. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी आपण अशाच प्रकारचे मेळावे घेतले होते. सभा घेतल्या. त्यांना निवडून आणण्यासाठी आपण झटलो. त्यांना निवडून देखील आणले. मात्र निवडून आल्यानंतर दीड दोन वर्षातच कोरोनाचे संकट आले. ज्यांना आपण निवडून आणले ते माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. त्यांना मी विचारले की तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका.

आढळरावांकडे विकासाची दृष्टी

लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीतून येणारा निकाल आपले भविष्य ठरवत असतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम लोकसभेच्या निवडणुकीतून आपल्याला करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकतीचा नेता आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला संसदेत पाठवायचा आहे. शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करायचे आहे असे आवाहन अजित पवार यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;