रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी

रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी

वनपरीक्षेत्र कराड अंतर्गत कासारशिरंबे–बेलवडे रस्त्यावर रानडुकराच्या अवैध शिकारीप्रकरणी वन विभागाने नऊजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

सोमनाथ बबन आडके, अमोल मारुती माने, सचिन हणमंत क्षीरसागर, सागर तानाजी यलमारे (सर्व रा. कासारशिरंबे, ता. कराड), गणेश नामदेव नंदीवाले (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), योगेश रघुनाथ कुंभार (रा. मानकापूर, ता. चिकोडी), अमोल गुंडाजी नंदीवाले (रा. कोथळे, ता. शिरोळ), अमित संजय आडके (रा. कासारशिरंबे) आणि दत्तात्रय धोंडीराम ढोणे (रा. पलूस, ता. पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मंगळवारी (दि. 11) पहाटे वनकर्मचारी गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार, बेलवडे रोडवर वाहन तपासणीदरम्यान वन्यप्राणी रानडुकरांची तस्करी उघडकीस आली. वाहनातून सात जिवंत रानडुक्कर, शिकारीसाठी लागणारे वाघर, गॅस साहित्य आणि तीन शिकारी कुत्री, असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपींनी हे रानडुक्कर मौजे राजेगाव व गव्हाणधडी (ता. माजलगाव, जि. बीड) येथून आणल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असून, त्यासाठी तीन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

सदर कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, दिलीप कांबळे (वनपाल कोळे), आनंद जगताप (वनपाल मलकापूर), दशरथ चिट्टे (वनरक्षक कासारशिरंबे), अभिनंदन सावंत (वनरक्षक कोळे), कविता रासवे (वनरक्षक तांबवे) तसेच रेस्क्यू टीममधील अजय महाडीक व रोहित कुलकर्णी यांच्या सहकार्याने
करण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी
वनपरीक्षेत्र कराड अंतर्गत कासारशिरंबे–बेलवडे रस्त्यावर रानडुकराच्या अवैध शिकारीप्रकरणी वन विभागाने नऊजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली...
सांगली महापालिकेत ‘कहीं कुशी कहीं गम’, माजी महापौर, उपमहापौरांसह अनेक दिग्गजांना धक्का
‘जयवंत शुगर’ची ऊस वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली, शनिवारी दर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन
अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबटय़ाने उचलून नेले, खारे कर्जुने येथील घटनेने घबराट
बालविवाहाचे अकोलेत आणखी दोन गुन्हे दाखल
अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्ट भूखंड प्रकरणाचा सखोल तपास करा, शिवसेनेचे किरण काळे यांचे धरणे आंदोलन स्थगित
मंत्र्यांच्या वर्चस्वामुळे संयोजकांवर गुन्हा नाहीच; बोरगावात बैलगाडा शर्यतीवेळी वृद्धाच्या मृत्यूसह अनेक जखमी, सांगलीकरांमधून संताप व्यक्त