बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जयसिंगपूर पोलिसांची कारवाई

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जयसिंगपूर पोलिसांची कारवाई

शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या टोळीचा जयसिंगपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून शंभर रुपयांच्या 68 हजार 400 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

साहील रफिक मुलाणी (वय 26, रा. उदगाव, ता. शिरोळ), ओंकार बाबुराव तोवार (रा. इचलकरंजी, सध्या रा. दानोळी, ता. शिरोळ), रमेश संतराम पाटील (वय 29, रा. बरगेमळा, जुना चंदूर रोड, इचलकरंजी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साहिल मुलाणी हा उदगाव शेजारील चिंचवाड येथे जनावरांच्या गोठय़ात व इचलकरंजी येथील बसवेश्वरनगर येथे शंभर रुपयांच्या बनावट नोटा बनवत होता. त्याच्यासोबत ओंकार तोवार आणि रमेश पाटील त्याला सहकार्य करत होते. या नोटा बाजारात खपवण्याच्या दृष्टीने हे तिघे कार्यरत असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांना मिळताच, पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी या टोळीकडून शंभर रुपयांच्या 68 हजार 400 रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि प्रिंटर, कटर, मोबाईल असा 19 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीत अजून कोणी सहभागी आहे का, याविषयी जयसिंगपूर पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट चलन तयार करून बाजारात खपविण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – आता मालिकांमध्येही प्री वेडिंग शूट, पाहा सखी-कान्हाचं फोटोशूट Photo – आता मालिकांमध्येही प्री वेडिंग शूट, पाहा सखी-कान्हाचं फोटोशूट
स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेतील मुख्य कलकार सखी-कान्हाचे लवकरच लग्न होणार असून त्यासाठी त्या दोघांचे प्री वेडिंग शूट करण्यात आले आहे....
पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था
दिल्लीत स्फोट झाल्याची अफवा, बसचा टायर फुटल्याने लोकांमध्ये दहशत
सर्व देवाच्या हातात आहे! धर्मेंद्र रुग्णालयातून परतल्यानंतर हेमामालिनी यांची पहिली प्रतिक्रीया
पार्थ पवारांच्या ‘काका मला वाचवा’ हाकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी ओ दिला, अंबादास दानवे यांची टीका
SA20 – ग्रॅमी स्मिथ म्हणाला, टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल शत्रू; बुमराहबाबतही मोठं विधान
तुर्की मधील बैठकीत शिजला दिल्लीतील बाॅम्बस्फोटाचा कट, डाॅक्टरांनी या अ‍ॅपचा केला होता वापर, वाचा सविस्तर