भरुचमध्ये फार्मा कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 2 कामगार ठार, 20 जण जखमी
फार्मा कारखानन्यात बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला तर अन्य 20 जण जखमी झाले. बॉयलरच्या स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली. गुजरातमधील भरुच जिल्ह्यात सायखा जीआयडीसी परिसरात बुधवारी पहाटे 2.30च्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर अनेक कामगार पळून जाऊन आपला बचाव करण्यास यशस्वी झाले.
स्फोटाची तीव्रता इतकी तीव्र होती की कारखान्याची इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. आग विझवल्यानंतर दोन मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत सुमारे 20 कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. एक कामगार बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घटनेनंतर कारखान्यासाठी आवश्यक परवानग्या आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या होत्या का हे तपासण्यासाठी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List