सरस्वती कन्या-ओम साईश्वर, श्री समर्थ-विद्यार्थी अंतिम झुंज

सरस्वती कन्या-ओम साईश्वर, श्री समर्थ-विद्यार्थी अंतिम झुंज

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने ओम साई ईश्वर सेवा मंडळ, लालबाग आयोजित पुरुष आणि महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत महिलांमध्ये सरस्वती कन्या विरुद्ध ओम साईश्वर तर पुरुषांमध्ये श्री समर्थ विरुद्ध विद्यार्थीची जेतेपदासाठी झुंज रंगणार आहे.

महिलांच्या उपांत्य फेरीमध्ये ओम साईश्वर सेवा मंडळाने शिवनेरी सेवा मंडळाचा 5-4 असा एक डाव राखून दणदणीत पराभव केला तर महिलांच्या दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस्वती कन्या संघाने अमरहिंद मंडळाचा  4-3 असा तब्बल साडेसहा मि. राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरने माहीमच्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर 15-13 (मध्यंतर 15-07) असा एका डाव 2 गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला. दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा पेंद्राने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा 2.30 मि. राखून 11-10 (मध्यंतर 5-5) असा एका गुणाने शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पक्के केले. एक उपांत्य सामना वगळता अन्य लढती एकतर्फी झाल्या.


पहिल्या कसोटीतून नितीश रेड्डी बाहेर, जुरेलला संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून अष्टपैलू नितीश रेड्डीला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली असल्याची माहिती हिंदुस्थान संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोएशे यांनी आज दिली. गेल्या सहा महिन्यांपासून जुरेलने केलेली कामगिरी आणि नुकतेच दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या दोन झंझावाती शतकामुळे त्याला आंतरराष्ट्रीय संघाचे तिकीट मिळाले आहे.

‘सामना जिंकण्यासाठी रणनीती बनवणे अत्यंत आवश्यक आहे. नितीश रेड्डीच्या बाबतीत आम्ही रणनीती बदलली आहे, त्याला ऑस्ट्रेलियामध्ये जास्त संधी मिळाली नव्हती. मात्र आगामी मालिकेचे महत्त्व, तेथील परिस्थिती पाहता नितीश रेड्डी या कसोटी सामन्याचा भाग नसेल,’ असे  रेयान टेन डोएशे यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बोरिवलीमध्ये बेकायदा पार्किंग, मोठ्या ट्रॉलीमुळे वाहतूककोंडी पालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष बोरिवलीमध्ये बेकायदा पार्किंग, मोठ्या ट्रॉलीमुळे वाहतूककोंडी पालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष
बोरिवली पश्चिममधील फॅक्टरी लेन, एम.के. स्कूलजवळील संपूर्ण फुटपाथवर होणारे बेकायदा पार्पिंग आणि ट्रॉलीमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. शाळा सुटल्यावर तर...
जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे 12 वाजणार पुढील हंगामापासून 12 कसोटी संघांना सामावून घेण्याचा प्रस्ताव, तसेच एकदिवसीय सुपर लीगही पुन्हा सुरू करण्याची शिफारस
निवडणुकीसाठी काय पण…तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्करांना भाजपच्या पायघड्या
जालना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी
मुलुंडमधील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त, पाच जणांना अटक
पवईत शौचालयाच्या टाकीत, पडून एकाचा मृत्यू, एक गंभीर
कोकण रेल्वे मार्गावर ‘डिजी लॉकर’ सुविधा