अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्ट भूखंड प्रकरणाचा सखोल तपास करा, शिवसेनेचे किरण काळे यांचे धरणे आंदोलन स्थगित

अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्ट भूखंड प्रकरणाचा सखोल तपास करा, शिवसेनेचे किरण काळे यांचे धरणे आंदोलन स्थगित

अहिल्यानगर शहरातील श्री ऋषभ संभव श्वेतांबर संघ जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करून त्या जागी राजकीय कार्यालय उभारल्याप्रकरणी सहधर्मादाय आयुक्तांनी तत्काळ सखोल चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश धर्मादाय उपायुक्त, अहिल्यानगर यांना काढले. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी सुरू केलेले धरणे आंदोलन तूर्त स्थगित केले.

अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप केल्याप्रकरणी किरण काळे यांनी सहधर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, आठ दिवस उलटूनही त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सहधर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयासमोर पुण्यात धरणे आंदोलन केले. यामुळे सहधर्मादाय आयुक्तांनी तत्काळ सखोल चौकशी करून कार्यवाहीचा कार्यपूर्तता अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश धर्मादाय उपायुक्त, अहिल्यानगर यांना काढले. या आदेशानंतर काळे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जाहीर केले.

किरण काळे यांनी सकाळी पुण्यातील सहधर्मादाय आयुक्तालयापुढे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अहिल्यानगरसह पुण्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तत्पूर्वी, काळे यांनी ‘एचएनडी जैन बार्ंडग’ येथे आचार्य गुरुदेव गुप्तिनंदीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. दुपारी माजी आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे आदी आंदोलनस्थळी दाखल झाले. धंगेकर यांनी यशस्वी शिष्टाई केली. ठोस आश्वासनाचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर काळे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी विकेश गुंदेचा, अक्षय जैन, राजेंद्र शहा, पुनित भंडारी, कल्पेश कटारिया, ऍड. सुकौशल जिंतूरकर, डॉ. सुजाता बरगाळे, विलास उबाळे, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, सुशांत मस्के, प्रतीक बारसे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, सुनील उबाळे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

प्रसंगी ‘संथारा’ घेऊन मरण पत्करेन!

ही लढाई संपलेली नाही. शहर लोकप्रतिनिधी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आणि अन्य ट्रस्टींशी ‘अर्थपूर्ण’ संगनमत करून धर्मकार्यासाठीचा भूखंड हडप केल्याचा पुनरुच्चार करीत, ‘हा भूखंड जैन समाजाला परत मिळवून देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही,’ असे काळे म्हणाले. ‘वेळप्रसंगी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड वाचविण्यासाठी ‘संथारा’ घेऊन मी मरण पत्करेन,’ अशी प्रतिज्ञाही काळे यांनी केली.

या बाबींची होणार चौकशी

देणगीदार मंगूबाई व्होरा यांनी संबंधित भूखंड कोणालाही विकू नये, कोणत्याही कारणास देऊ नये, केवळ धर्मकार्यासाठी वापरावा, अशा अटी व शर्ती मृत्युपत्रात घातल्या असतानाही त्याचे उल्लंघन का केले गेले? शहर लोकप्रतिनिधींचे राजकीय कार्यालय तेथे कसे काय थाटले गेले? धर्मादाय कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता तथाकथित भाडेकरूला संपूर्ण भूखंड कसा काय दिला गेला? भूखंड विक्रीची नोटीस कशी प्रसिद्ध करण्यात आली? भूखंड विक्रीचा घाट कोणी संगनमताने घातला? याची चौकशी होणार आहे.

आरोपांना उत्तर देणार!

ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा आणि ट्रस्टींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत किरण काळे, मनोज गुंदेचा यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. यावेळी किरण काळे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे किरण काळे यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – आता मालिकांमध्येही प्री वेडिंग शूट, पाहा सखी-कान्हाचं फोटोशूट Photo – आता मालिकांमध्येही प्री वेडिंग शूट, पाहा सखी-कान्हाचं फोटोशूट
स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेतील मुख्य कलकार सखी-कान्हाचे लवकरच लग्न होणार असून त्यासाठी त्या दोघांचे प्री वेडिंग शूट करण्यात आले आहे....
पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था
दिल्लीत स्फोट झाल्याची अफवा, बसचा टायर फुटल्याने लोकांमध्ये दहशत
सर्व देवाच्या हातात आहे! धर्मेंद्र रुग्णालयातून परतल्यानंतर हेमामालिनी यांची पहिली प्रतिक्रीया
पार्थ पवारांच्या ‘काका मला वाचवा’ हाकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी ओ दिला, अंबादास दानवे यांची टीका
SA20 – ग्रॅमी स्मिथ म्हणाला, टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल शत्रू; बुमराहबाबतही मोठं विधान
तुर्की मधील बैठकीत शिजला दिल्लीतील बाॅम्बस्फोटाचा कट, डाॅक्टरांनी या अ‍ॅपचा केला होता वापर, वाचा सविस्तर