Red Fort Bomb Blast – दहशतवादी डॉक्टरांना निधी कुठून मिळत होता? शाहीनच्या अकाउंटवरून धक्कादायक माहिती उघड
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी, जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित ‘व्हाइट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली. शाहीनच्या खात्यात परदेशातून पैसे जमा झाल्याचे आता निदर्शनास आलेले आहे. त्यामुळेच आता शाहीनची सतत चौकशी केली जात आहे. शिवाय, मौलवी इरफान अहमद जैशच्या एका कमांडरच्या संपर्कात होती आणि जैशकडून निधीही मिळत होता.
तपास यंत्रणा आता जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद मॉड्यूलच्या दहशतवादी निधीची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन सईदला दहशतवादी संघटना जैशकडून निधी मिळत होता. जैशच्या आदेशानुसार पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी महिला शाखेसाठी भरती केंद्रे उघडण्यात शाहीनचा सहभाग होता. शहराच्या थोड्या बाहेरील भागात आणि कमी मानवी हालचाली असलेल्या सहारनपूर आणि हापूरमध्ये मिनी रिक्रूट-कमांड सेंटरसाठी शाहीन जागा शोधत होती.
सोमवारी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका ह्युंदाई आय२० कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याचे (UAPA) कलम लागू केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List