रोहा अष्टमी बँकेच्या इमारतीचा खरेदी व्यवहार कोर्टात, बँक व्यवस्थापनाची न्यायालयात धाव; गैरव्यवहाराविरोधातील ठेवीदारांच्या आंदोलनाला यश

रोहा अष्टमी बँकेच्या इमारतीचा खरेदी व्यवहार कोर्टात, बँक व्यवस्थापनाची न्यायालयात धाव; गैरव्यवहाराविरोधातील ठेवीदारांच्या आंदोलनाला यश

रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत आणि जागेच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप बँकेच्या भाग भांडवलदार आणि ठेकेदारांनी केला होता. याची गंभीर दाखल घेत सहकार विभागाने हा लिलाव रद्द करण्याचे आदेश दिले होते. मात्र यानंतरही रायगड जिल्हा उपनिबंधकांनी लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली नव्हती. या दिरंगाईमुळे बिल्डरने आपले नाव थेट बँकेच्या प्रॉपर्टी कार्डवरच चढवले. यामुळे संतप्त ठेवीदारांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसताच हादरलेल्या प्रशासनाने बँक इमारत खरेदी रद्द करण्यासाठी माणगाव न्यायालयात घाव घेत इमारतीचा ताबा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. तसे लेखी पत्र जिल्हा उपनिबंधकांनी दिल्याने आंदोलकांनी 17 नोव्हेंबर रोजीचे उपोषण स्थगित केले.

बिल्डरचे नातेवाईक रोहा अष्टमी अर्बन बँकेचे थकीत पाठपुरावा ठेवीदार आणि भाग भांडवलदार यांना अंधारात ठेवून बँकेचे कस्टोडियन नीलेश शिंदे यांनी रोहा अष्टमी अर्बन बँकेच्या इमारतीसह जमीन कवडीमोल भावात लब्धी बिल्डरच्या घशात घातली. या मालमत्तेची किंमत चार कोटी असताना अवघ्या एक कोटी दहा हजार रुपयांत हा व्यवहार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे कर्जदार असतानाही हा व्यवहार करण्यात आला. या गैरव्यवहाराला सर्वात आधी दैनिक ‘सामना’ने वाचा फोडली होती. यानंतर सभासद आणि ठेवीदारांनी आक्रमक भूमिका घेतली. यानंतर बँक इमारत लिलाव प्रकरणात अनियमितता झाल्याचे पत्र सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी जिल्हा उपनिबंधकांना पाठवले होते. मात्र तरीही दहा महिने जिल्हा उपनिबंधकांनी स्थगितीबाबतीत कार्यवाही केली नाही. त्यामुळे कारवाईचा नुसता आव नको कारवाईच हवी असा इशारा देत बँकेची शेवटची मालमत्ता असलेली इमारत वाचवण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात ठेवीदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी रानडुकराची अवैध शिकार; नऊ आरोपींना वनकोठडी
वनपरीक्षेत्र कराड अंतर्गत कासारशिरंबे–बेलवडे रस्त्यावर रानडुकराच्या अवैध शिकारीप्रकरणी वन विभागाने नऊजणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली...
सांगली महापालिकेत ‘कहीं कुशी कहीं गम’, माजी महापौर, उपमहापौरांसह अनेक दिग्गजांना धक्का
‘जयवंत शुगर’ची ऊस वाहतूक शेतकऱ्यांनी रोखली, शनिवारी दर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन
अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीला बिबटय़ाने उचलून नेले, खारे कर्जुने येथील घटनेने घबराट
बालविवाहाचे अकोलेत आणखी दोन गुन्हे दाखल
अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्ट भूखंड प्रकरणाचा सखोल तपास करा, शिवसेनेचे किरण काळे यांचे धरणे आंदोलन स्थगित
मंत्र्यांच्या वर्चस्वामुळे संयोजकांवर गुन्हा नाहीच; बोरगावात बैलगाडा शर्यतीवेळी वृद्धाच्या मृत्यूसह अनेक जखमी, सांगलीकरांमधून संताप व्यक्त