Delhi Bombblast दिल्ली बॉम्बस्फोटाप्रकरणी फरिदाबादच्या कार डिलरला अटक
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने फरिदाबादमधील कार डिलरला अटक केली आहे. अमित असे त्याचे नाव असून तो फरिदाबादमधील रॉयल कार प्लाझाचा मालक आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटात वापरलेली ह्युंदाई i20 ही गाडी या डिलरने विकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी अमितच्या कार प्लाझावर धाड टाकली व त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली आय-20 कार पुलवामाचा रहिवासी असलेल्या उमर उन नबी या डॉक्टरची असून त्यानेच स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी उमरचा डॉक्टर मित्र सज्जाद अहमद मल्ला व त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List