Mumbai News – साफसफाई करताना सेप्टीक टँकमध्ये पडून कामगाराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
सेप्टीक टँकची साफसफाई करताना टाकीत पडून एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयासमोरील राज ग्रँड दोई इमारतीजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली. जखमीला उपचारासाठी हिरानंदानी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. फुलचंद कुमार असे जखमी कामगाराचे नाव आहे. मृत कामगाराची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
अल्ट्रा टेक प्रायव्हेट लिमिटेडमधील दोन्ही कामगार सेप्टीक टँक साफ करण्यासाठी नेमले होते. साफसफाई करताना दोघे टँकमध्ये पडले. विषारी वायूमुळे गुदमरून एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत आहे. मुंबई अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली. पोलीस, रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
दोन्ही कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाला मृत घोषित करण्यात आले असून दुसऱ्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृत कामगाराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List