दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, केंद्र सरकारने दिली माहिती

दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, केंद्र सरकारने दिली माहिती

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्र सरकारने घोषित केले. ही घटना एक घृणास्पद गुन्हा असल्याचे म्हणत मंत्रिमंडळाने घटनेच्या जलद चौकशीचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळाने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळले.

मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारने लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला घोषित करत शोक व्यक्त केला. या बैठकीत मंत्रिमंडळाने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र शोक व्यक्त करणारा आणि पीडितांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मंजूर केला. दोषींची लवकरच ओळख पटवण्यात येईल आणि त्यांच्यावर विलंब न करता कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शरीरातील ताकद कमी झालीये? रामदेव बाबांनी सांगितलेली ही आसने करा अन् तंदुरुस्त बना शरीरातील ताकद कमी झालीये? रामदेव बाबांनी सांगितलेली ही आसने करा अन् तंदुरुस्त बना
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. बरेच लोक बसून काम करतात, त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली...
MCA Election – अजिंक्य नाईक अध्यक्ष, जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष; कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची निवड
ट्रकला धडकल्यानंतर बस खोल दरीत कोसळली, 37 प्रवाशांचा मृत्यू; 13 जण जखमी
सुनावणीची बतावणी सुरु आहे; शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
दिल्लीतील स्फोट हा दहशतवादी हल्ला, केंद्र सरकारने दिली माहिती
दिल्ली बॉम्बस्फोटातील हल्लेखोराची लाल रंगाची इकोस्पोर्ट सापडली, पोलिसांच्या शोध मोहिमेला यश
Photo – मैत्रिणीच्या लग्नात अनन्याचा जलवा