थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ हर्बल टी, शरीराला आतुन मिळेल ऊर्जा आणि रोगप्रतिकारकशक्ती होईल मजबूत

थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ हर्बल टी, शरीराला आतुन मिळेल ऊर्जा आणि रोगप्रतिकारकशक्ती होईल मजबूत

थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, सुकामेवा, नट्स, बिया इत्यादींचा समावेश नक्कीच करावा. कारण यांच्या सेवनाने आपले आरोग्य तंदुरस्त राहते. तसेच ऋतूत बदल झाल्याने वातावरण देखील बदलते आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यात थंड हवामानामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि सौम्य ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तर या समस्यापासून दूर राहण्यासाठी काही नॅचरल हर्ब्सचा वापर देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. तर थंडीच्या दिवसांमध्ये हर्बल टीचे सेवन हे हंगामी आजारांपासुन बचाव आणि आराम दोन्हीसाठी खूप फायदेशीर असते.

नॅचरल हर्ब्स पासून हर्बल टीचे मिश्रण बनवले जाते आणि या हर्बल टीचे सेवन तुम्हाला थंडीच्या दिवसात सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यासोबतच तुम्ही जर तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून दिवसातून एकदा मर्यादित प्रमाणात हर्बल चहा घेतला तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करेल. चला तर मग थंडीच्या दिवसात कोणत्या हर्बल टीचे सेवन केले पाहिजे ते जाणून घेऊयात…

थंडीच्या दिवसात या हर्बल टीचे करा सेवन

हर्बल टी मध्ये साखर आणि दूधाचा अजिबात वापर करू नका. चहा पावडर देखील वापरू नका.

अदरक-तुळस हर्बल टी

थंडीत तुम्ही अदरक आणि तुळसीचा हर्बल टी बनवू शकता आणि पिऊ शकता. अदरक आणि तुळस हे अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहेत. हेल्थलाइनच्या मते अदरकमध्ये जिंजरॉल नावाचे एक पॉवरफूल अँटी-इंफ्लेमेटरी बायोएक्टिव्ह कंपाऊंड असते, जे त्याच्या अनेक औषधी गुणधर्मांसाठी फार उपयुक्त आहे. शिवाय आयुर्वेदात तुळशीला एक औषधी वनस्पती मानले जाते.

ज्येष्ठमध-लवंग हर्बल टी

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ज्येष्ठमध आणि लवंग यापासून काढा बनवून म्हणजेच हर्बल टी बनवून प्यावे. कारण ज्येष्ठमध हे घसा खवखवणे आणि खोकल्यापासून आराम देते. तर लवंगमधील असलेले गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला या समस्या उद्भवत नाही. या हर्बल टी मुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

हळद-दालचिनी हर्बल टी

स्वयंपाकघरात सामान्यतः मसाला म्हणून वापरल्या जाणाऱ्या हळद आणि दालचिनीमध्ये औषधी गुणधर्म देखील भरपूर असतात, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुमचे शरीर आतून उबदार राहते. तुम्ही या दोन्ही औषधी वनस्पती पाण्यात उकळून हर्बल टी म्हणून सेवन करू शकता किंवा दुधात हळद व दालचिनी पावडर मिक्स करून पिऊ शकता.

निलगिरी चहा देखील फायदेशीर आहे

हिवाळ्यात, तुम्ही निलगिरीच्या पानांपासून चहा बनवून पिऊ शकता, जो अनेक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. हेल्थलाइनच्या मते, ते तुमच्या शरीराचे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करते. तसेच निलगिरी चहा थंडीत सर्वात जास्त प्रमाणात होणारी सर्दीची लक्षणे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या ४ प्रकारची पाने रात्री चावून खा, सकाळी पोट होईल एकदम साफ, पाहा कोणती ? या ४ प्रकारची पाने रात्री चावून खा, सकाळी पोट होईल एकदम साफ, पाहा कोणती ?
तुमचे पोट जर सकाळी नीट साफ होत नसेल तर दिवसभर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. टॉयलेटला गेल्यानंतरही पोट नीट साफ...
दिलजीत दोसांझला खलिस्तानी समर्थकांकडून धमक्या, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये “खलिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा
हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करणाऱ्या परदेशी पर्यटकाचा मनालीच्या टेकड्यांमध्ये अपघात
Pune News – बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी महिलांची अनोखी शक्कल, टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घातला
Ratnagiri News – राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत उमरे येथील तरुणाचा मृत्यू
बाजार समितीत चोर्‍यांचे प्रमाण वाढले, भाजीपाल्याच्या गाळ्यावरच मटक्याचा धंदा
कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…