संपूर्ण जीवनात महिला किती किलो लिपस्टीक खातात ? जाणून बसेल धक्का
लिपस्टीक महिलांचे आता आवश्यक मेकअप प्रोडक्ट्स बनले आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करण्यापासून ते गृहिणी असलेल्या महिला देखील डेली रुटीनमध्ये लिपस्टीक ओठांना लावत असतात. कोणत्याही हेवी मेकअप शिवाय केवळ लिपस्टीक लावल्यानंतर वैयक्तिमत्व चांगले दिसते. परंतू लिपस्टीक तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स शरीरास हानिकारक असतात यावर वारंवार चर्चा होत असते. लिपस्टीक लावल्यानंतर अनेकदा ती नकळत पोटात जात असते. चला तर पाहूयात एक महिला संपूर्ण जीवनात किती प्रमाणात लिपस्टीक खात असते !
डेली रुटीन वा ऑफीस जाणाऱ्या महिला परफेक्ट लुकसाठी किंवा पार्टीला जाताना स्टायलिशी अटायर विअर करताना लिपस्टीक लावतातच. लिपस्टीक तुमचे वैयक्तिमत्व खुलवत असेल परंतू अनेक अभ्यासात आढळले आहे की यामुळे आरोग्यास किती नुकसान होते. आता महिला संपूर्ण जीवनात किती किलो लिपस्टीक खातात हे देखील संशोधकांनी शोधून काढले आहे.
शरीरात जाते इतकी लिपस्टीक
संपूर्ण जीवनात एखाद्या महिलेच्या पोटात नकळतपणे किती लिपस्टीक जाते याचा जर विचार केला तर तुम्हाला ती काही ग्रॅम वाटू शकते. परंतू असे नाही. जर तुम्ही रेग्युलर लिपस्टीक लावणाऱ्या महिला आहात तर तुमच्या संपूर्ण लाईफमध्ये तु्म्ही ४ ते ९ पौंडापर्यंत लिपस्टीक खाता. ज्याचे वजन ( १.८ ते ४ किलोग्रॅम ) भरते. ही माहिती वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्सवर देण्यात आली आहे.
लिपस्टीक संबंधित काही बाबी
सर्वात महत्वाचे म्हणजे लिपस्टीक खरेदी करताना ब्रँड पासून ते फॉर्म्युला पर्यंत छोट्या-छोट्या बाबी महत्वाच्या आहेत. चला तर पाहूयात काही आहे या बाबी …
खूप सारे असे व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यात तुम्ही पाहिले असेल की लिपस्टीक मध्ये खतरनाक केमिकल्स मिसळलेले असतात. अशात योग्य ब्रँड निवडावा त्यातील घटक कोणतेही आहेत याची माहिती घ्या..
लिपस्टीक आणि कोणतेही ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताना लक्षात ठेवा ते पॅराबेन फ्री असावे. हे कंपाऊंड शरीरातील हार्मोनला प्रभावित करु शकते. लिपस्टीकमध्ये लेड ( शीसे), कॅडियम, पॅराबेन्स, थॅलेट्स, ब्युटाईलेटेड हायड्रॉक्सीएनिसोल (BHA) आणि ब्युटाईलेटेड हायड्रॉक्सीटोल्युईन, पेट्रोलियम, कृत्रीम रंग, ट्रायक्लोसन, फार्मोल्डिहाईड, टोल्युनी, सारखे केमिकल्स असू शकतात.
जर कोणतीही लिपस्टीक वा लिप बाम लावताना ओठ जर ड्राय होऊ लागले वा कोणत्याही प्रकारची एलर्जी होत असेल तर ती लावणे बंद करावे आणि डर्मोटलॉजिस्टचा या संदर्भात सल्ला घ्यावा
सॉफ्ट लिप्सचे टिप्स
ओठांची त्वचा खूपच नाजूक असते. आणि ऑईल ग्लँड्स नसल्याने ते सेन्सिटीव्ह देखील असतात. त्यामुळे ड्रायनेस आणि पिग्मेंटेशन वेगाने वाढते. यासाठी लिपस्टीक खरेदी करताना तुम्ही नीट तपासा की नॅचरल ऑईल, विटामिन्स ई, किंवा हेल्दी मॉईस्चाईरजर एजेंट्स असायला हवेत.याशिवाय डेली रुटीनमध्ये रात्री लिपस्टीक क्लीन केल्यानंतर ओठांना मॉइस्चराइज जरुर करावे, दर आठवड्यातून एकदा जेंटल स्क्रबने डेड स्कीनला देखील स्वच्छ करावे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List