जर तुमच्या तोंडात डास किंवा माशी गेली तर काय करावं? तज्ज्ञांनी काय सांगितलं? जाणून घ्या अन्यथा जीवही जाऊ शकतो
प्रत्येकाला कधीनी कधी असा अनुभव आला असेलच की अचानक बोलताना किंवा काहीतरी खाताना तोंडात चुकून माशी किंवा डास गेल्याचा अनुभव आला असेल. त्यावेळी पटकन व्यक्ती ते तोडांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो किंवा पाण्याने चूळ भरतो. पण ही गोष्ट जरी सामान्य वाटत असली तरी देखील ही परिस्थिती कधीतरी जीवघेणीही ठरू शकते. जो प्रकार घडला होता तो अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूरसोबत. त्याच्या तोंडात अचानक मधमाशी गेल्याने त्याला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा घटना कधीही सामान्य समजण्याची चूक करू नये.
पण जर अशी परिस्थिती कधी ओढावली म्हणजे माशी, डास किंवा मधमाशीसारखे कीटक अचानक तुमच्या तोंडात शिरल्यास त्वरित काय करावं जेणेकरून आपण सुरक्षित राहू शकू हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
तोंडात डास किंवा माशी गेली तर काय करावं?
तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीत सर्वप्रथम सतर्क रहा आणि काही विशेष पद्धतींचा अवलंब करा. जर तुमच्या तोंडात माशी किंवा डास शिरला तर सगळ्यात आधी घाबरून न जाता काय उपचार करायचा हा विचार करा.
शांत राहा, घाबरू नका
तज्ज्ञांच्या मते प्रथम, घाबरू नका. चिंतेमुळे जलद श्वासोच्छवास होऊ शकतो, ज्यामुळे जंत श्वासनलिकेमध्ये ढकलले जाऊ शकते. यामुळे गुदमरण्याचा धोका वाढतो, तसेच फुफ्फुसांना सूज किंवा अडथळा निर्माण होतो.
थुंकून ती माशी किंवा डास बाहेर काढण्याचा प्रयत्न करा
माशी किंवा डास, किंवा तो किडा अजूनही तोंडात असेल तर तो लगेच थुंकून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.
कोमट किंवा गरम पाण्याने गुळण्या करा
जर तुम्हाला घशाजवळ माशी किंवा डास अडकल्याचं जाणवत असेल तर कोमट पाण्याने लगेच गुळण्या करा. यामुळे किडा बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.
खोकण्याचा प्रयत्न करा
जर तुम्हाला घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटत असेल तर जोरात खोकण्याचा प्रयत्न करा. डास बाहेर काढण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.
ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या व्यतिरिक्त, जर तुम्हाला तोंडात किंवा घशात सूज येत असेल किंवा वेदना होत असतील, किंवा चक्कर येत असेल तर दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा आणि उपचार सुरु करा.
पण सोबतच जेवताना किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपणच नेहमी काळजी घेतली पाहिजे की अशापद्धतीच्या घटना घडल्या नाही पाहिजेत. शिवाय जर असं झालंच तर घाबरून न जाता पटकण उपाययोजना केल्या पाहिजेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List