अविवाहित मुलगी भत्त्यासाठी पात्र ठरू शकत नाही, केरळ हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
जर एखादा पुरुष विभक्त पत्नीला पोटगी देत असेल तर तो तिच्या अविवाहित मुलीला वेगळा भत्ता देऊ शकत नाही किंवा ती अविवाहित मुलगी आपल्या वडिलांकडून घरखर्चासाठी पोटगी मागू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ हायकोर्टाने दिलाय. एका 65 वर्षीय ख्रिश्चन पुरुषाने दाखल केलेल्या याचिकेत कुटुंब न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, या व्यक्तीने आपल्या विभक्त पत्नीला दरमहा 20,000 रुपये आणि आपल्या 27 वर्षीय अविवाहित मुलीला दरमहा 10,000 रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.
कुटुंब न्यायालयाच्या याच निर्णयाला या व्यक्तीने केरळ हायकोर्टात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्याच्या वकिलाने हायकोर्टात असा युक्तीवाद केला की, मुलगी याचिकेच्या वेळी प्रौढ होती आणि त्यामुळे ती पोटगी मिळण्यास पात्र नाही. तसेच ज्या पत्नीला पोटगी दिली जात आहे. ती पत्नी त्याला सोडून गेली आहे आणि ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकेला अंशतः मान्यता देत मुलीला मासिक 10,000 रुपयांचा भरणपोषण देण्याचा आदेश रद्दबातल ठरवला. जर मुलगी प्रौढ असेल, तर ती शारीरिक किंवा मानसिक स्थितीमुळे स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ असेल तरच ती पोटगी मागू शकते, असे हायकोर्टाने नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List