तुम्ही कोणतं विष पोसताय ते डोळे उघडून बघा, उद्धव ठाकरे यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संगीता गायकवाड व इतर कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
”चांगल्या दिवशी तुम्ही पक्षात आला आहात. आज नरकचतुर्थी आहे. नरकासूराचा वध करण्यासाठी आपण पक्षात आलेले आहात. नरकासूर कोण ते वेगळं सांगायची गरज नाही. आता हा प्रवाह सुरू झालेला आहे. चोरांना वाटत होतं की चोरी पकडली जाणार नाही. पण चोरासह चोरी पकडली आहे. सर्व चोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी माणसासोबत अमराठी देखील एकत्र आले आहेत. कुणालाच हुकुमशाही नकोय. लालुच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून पक्षांतर करणारी नेभळट माणसं आहात. त्या पेक्षा कट्टर निष्टावंत शिवसेनेत येतोय. भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण कोणतं विष पोसत आहात त्याकडे नीट डोळे उघडून बघा. आपण इतिहासात या पापाचे धनी होऊ देऊ नका ही विनंती”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List