वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जेमिमाने मानधन केले डबल

वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जेमिमाने मानधन केले डबल

हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी तब्बल 47 वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या या विजयानंतर महिला खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयने देखील टीम इंडियाला 50 कोटींचे बक्षिस जाहीर केले आहे. या विजयानंतर संघातील खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये चांगलीच वाढली आहे. संघातील सर्व खेळाडूंनी त्यांच्या ब्रँड एन्डोर्समेंट फी 25 ते 100 टक्क्यांनी वाढ केली आहे.

सध्या ब्रँडिंगच्या बाबतीत जेमिमा रॉड्रिग्ज ही आघाडीवर असून तिने तिच्या मानधनात दुपटीने वाढ केली आहे. तिच्यासोबतच स्मृती मनधना, हरमनप्रीत कौर, दीप्ति शर्मा, शेफाली वर्मा यांनी देखील त्यांचे मानधन वाढवले आहे. या विजयाचा परिणाम या क्रिकेटपटूंना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही दिसून आला आहे. टीम इंडियातील सर्व महिला खेळाडूंच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सध्या जेमिमा रॉड्रिग्ज ही एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 75 लाख ते दीड कोटीपर्यंत मानधन घेत आहे. तर स्मृती मनधाना ही देशातील सर्वाधिक मानधन घेणारी महिला खेळाडू असून सध्या तिच्याकडे 16 ब्रँड्स आहेत. स्मृती एका ब्रँडसाठी 1.5 ते 2 कोटी घेत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची? आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला – हर्षवर्धन सपकाळ निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची? आयोगाने जबाबदारीपासून पळ काढला – हर्षवर्धन सपकाळ
मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार...
शिक्षेपूर्वीच दिर्घ तुरुंगवास भोगल्याने हायकोर्टाचा दिलासा, 2011 च्या तिहेरी बॉम्बस्फोटातील आरोपीला जामीन
पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा मनमानी कारभार, बैठकीत चर्चेविना ठरावाला मंजुरी; बेकायदेशीररित्या ३६ कोटी केले वर्ग
Mumbai News – मुंबईत हायफाय सोसाटीतील फ्लॅटमध्ये आढळला मोलकरणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू
‘या’ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी होणार निवडणुका, वाचा संपूर्ण जिल्हानिहाय यादी
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झाल्याची खात्री पटली, आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंचा संताप
किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष