अमेरिकेपासून आशियाच्या शेअर बाजारात घसरण; हिंदुस्थानी बाजाराचीही घसरगुंडी

अमेरिकेपासून आशियाच्या शेअर बाजारात घसरण; हिंदुस्थानी बाजाराचीही घसरगुंडी

जागतिक अर्थव्यवस्था, अमेरिकेतील शटडाऊन आणि अमेरिकेच्या अण्वस्त्र चाचणीच्या घोषणेमुळे जागतिक शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या अनेक शेअर बाजारात तीव्र घसरण दिसून आली. या नकारात्मक जागतिक संकटामुळे हिंदुस्थानी शेअर बाजारातही मंगळवारी मोठी घसरण दिसून आली. सोमवारी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली असतील तरी नंतर बाजार सावरला. मात्र, जागतिक संकटामुळे मंगळवारी पुन्हा शेअर बाजारात घसरण दिसून आली.

सोमवारी शेअर बाजारात चढउतार दिसून आले. दिवसभर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक चढउतार झाले. सुरुवातीच्या व्यवहारात ते अचानक घसरले असले तरी, ते अचानक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत असल्याचे आढळले. अखेर, सेन्सेक्स आणि निफ्टी थोड्याशा वाढीसह बंद झाले. मंगळवारी, शेअर बाजारात परदेशातून नकारात्मक संकेत येत होते. त्यामुळे मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी मंदीत सुरू झाले आणि नंतरही त्यात घसरण दिसून येत होती.

अमेरिका, जपानपासून ते कोरियापर्यंत, सर्व शेअर बाजार मंदीत व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही घसरण दिसून येत आहे. त्याचा परिणाम हिंदुस्थानी शेअर बाजारावरही दिसत असून शेअर बाजाराची घसरगुंडी सुरू आहे. अमेरिकेपासून आशियाई बाजारांपर्यंत, आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी मंगळवारी, परदेशातून शेअर बाजाराला नकारात्मक संकेत मिळथ होते. बाजार सुरु होताच सेन्सेक्स ८३,९२३ वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २५,७४४ वर सुरू झाला आणि नंतर २५,७२२ वर घसरला. १५ मिनिटांच्या ट्रेडिंगनंतर, सेन्सेक्स १६७ अंकांनी घसरला, तर निफ्टी ६० अंकांनी खाली व्यवहार करत होता.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की काल अमेरिकन शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. डाऊ फ्युचर्स ५३ अंकांनी घसरून ४७,२६१.९० वर बंद झाला, तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी २२६ अंकांनी घसरून ४७,३५७ वर बंद झाला. एस अँड पी ५०० इंडेक्स देखील ३० अंकांनी घसरून ६,८६५ वर बंद झाला. जपानचा निक्केई ५०.२० अंकांनी घसरून ५२,३६१.१४ वर व्यवहार करत होता, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ६८.५६ अंकांनी घसरून ४,१५३ वर व्यवहार करत होता. सीएसी (१२ अंक) आणि एफटीएसई१०० (१६ अंक) देखील घसरले. निफ्टीची सुरुवातही खराब झाली, २३.५० अंकांनी घसरून २५,८७६.५० वर व्यवहार करत होता. ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स २०० निर्देशांक ०.५६% ने घसरून बंद झाला, तर कोस्डॅक ०.२४% ने घसरला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष किडनी खराब होण्याचे ते 6 संकेत, ज्याकडे सर्वच करतात दुर्लक्ष
Kidney आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. मूत्रपिंड हे शरीरातील रक्तच शुद्ध करण्याचे काम करत नाही तर शरीरातील विषारी घटकही...
40 नंतर त्वचेची निगा राखण्यासाठी ‘हे’ दोन व्हिटॅमिन्स ठरतील फायदेशीर….
आतड्यांमधील घाण कशी काढायची? सद्गुरूंनी सांगितले 3 सर्वात प्रभावी मार्ग
बदलत्या ऋतूमध्ये कानाचं इंफेक्शन होऊ नये म्हणून नेमकं काय करावे?
ऑनलाईन मनी गेम्सवरील बंदी हटवा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे उत्तर मागवले
विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही ICC वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मानधनाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण
संगमनेरमध्ये प्रतिबंधित मांगुर माशाची तस्करी, कारवाईत 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त