दिवाळी सुट्टी संपताच कोर्ट इन ॲक्शन, दिव्यातील सात इमारती तत्काळ तोडण्याचे आदेश
          दिवाळी सुट्टी संपताच कोर्ट इन अॅक्शन आले असून दिव्यातील 7 बेकायदा इमारती तत्काळ तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बेकायदा इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला असून आज दिव्यात कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने दिव्यातील शीळ परिसरात पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. यापूर्वी काही इमारतींवर कारवाई करून या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मात्र दिवाळीचा सण आल्याने दिव्यातील या कारवाईला ब्रेक लागला होता. मात्र दिवाळीनंतर उर्वरित इमारतींवर पुन्हा एकदा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उगारत आज उर्वरित 7 बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पालिकेचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात गेले. ज्यावेळी पालिकेच्या पथकाने इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केल्यावर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहिवासी जमा झाले. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. केवळ दोन इमारती रिकाम्या करण्यात पालिकेच्या अतिक्रमण पथकाला यश आले. तर येत्या तीन दिवसांत संपूर्ण इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.
पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले
इमारतींवरील कारवाईला विरोध करत असलेल्या एक महिलेने तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला.
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List