दूध खराब होऊ नये म्हणून… हे करून पहा
घरात दररोज लागणारे दूध खराब होऊ नये म्हणून शक्य तितक्या लवकर ते फ्रीजमध्ये ठेवावे. दिवसातून किमान दोन ते तीन वेळा त्याला व्यवस्थित उकळू द्यावे. त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवावे. फ्रिजमध्ये दुधाला टोमॅटोचा रस, लिंबू किंवा चटणीसारख्या आम्लयुक्त पदार्थांपासून दूर ठेवावे.
कच्च्या मांसासारख्या वस्तूंमुळे दुधाला वास येऊ शकतो आणि ते लवकर खराब होऊ शकते म्हणून त्यापासून दूर ठेवा. दूध खराब होण्यापासून वाचवण्यासाठी त्यात चिमूटभर बेकिंग सोडा किंवा चिमूटभर मीठ घालू शकता. जर दुधाला वास किंवा चव बदलली असेल तर ते वापरू नका. कारण ते खराब झालेले असू शकते. दुधाची जास्त दिवस साठवणूक करू नये.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List