रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आक्रमक, महिला आघाडीचे पुण्यात आंदोलन
महिलांचा अपमान करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. चाकणकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेना पुणे शहर महिला आघाडीने शुक्रवारी जोरदार आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान चाकणकर यांच्या समर्थनार्थ आलेल्या महिलांचा शिवसेनेच्या रणरागिणीने चांगलाच समाचार घेत त्यांना पिटाळून लावले. धायरी गारमाळ मुख्य रस्त्यावरील रूपाली चाकणकर यांच्या संपर्प कार्यालयाबाहेर तसेच धायरी फाटा येथे दोन ठिकाणी एकाच वेळी आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्योती चांदरे, अमृत पठारे, रेखा कोंडे, स्वाती कथलकर, जयश्री भणगे, विद्या होडे, निकिता मारटकर, सरोज कार्वेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीचे पुण्यात रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन… pic.twitter.com/ZWGUhfJx7Z
— Saamana Online (@SaamanaOnline) October 31, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List