महायुतीचे गणित फिस्कटणार; महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार?

महायुतीचे गणित फिस्कटणार; महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे शहरात मात्र महायुतीच्या चिंधड्या उडणार असल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मागील २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एकहाती सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार शहराचे कारभारी होते. मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सत्तेला भाजप आमदार कै. लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी सुरुंग लावत भाजपची एकहाती सत्ता आणली. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही पालिका निवडणुकीत मतदारांनी आपल्याला नाकारले, त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी सुरुवातीला शहराकडे दुर्लक्ष केले होते. एक-दीड वर्षानी पुन्हा पवार यांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातले. आता आगामी महापालिका निवडणुकीत बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र येतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शहरात मिंधे गट मात्र भाजपबरोबर युती करून लढणार असल्याची माहिती आहे. मिंधे गटाची भाजपकडून १२८ जागांपैकी अवघ्या ७-८ जागांवर बोळवण होण्याची शक्यता आहे.

मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकीचे प्रयत्न

महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप साम, दाम, दंड सर्व वापरण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मतदार एकच आहेत. दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने आल्यास याचा फटका बसणार आहे. याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मत विभाजनाची चिंता असून, शहरात एकत्र लढल्यास फायदा होईल, असे आडाखे पदाधिकारी बांधत आहेत. त्यामुळेच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र लढल्यास महापालिकेतील सत्तेची दारे पुन्हा उघडतील, असा त्यांना विश्वास आहे.

महापालिका निवडणूक एकत्र लढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रस्ताव आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी अंतिम बोलणी व्हायची आहे. एकत्र लढण्यास हरकत नसल्याचे अजित पवार यांना सांगितले आहे. मतांचे विभाजन होऊ नये यासाठी एकत्र आले पाहिजे. राजकारण बेरजेचे असले पाहिजे. वेगळे लढलो, तर भाजपला त्याचा फायदा होईल. दोन्ही पक्ष एकत्र लढल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद होईल.

योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष.

भाजपला रोखण्यासाठी शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या पक्षांसोबत युती होऊ शकते. भाजपच्या विरोधात जे आहेत, त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत. याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. जागावाटपात कोणतीही अडचण येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या शहराध्यक्षांसोबत चर्चा करणार आहे.

तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या वेलचीचे नव्हे तर त्याच्या पानांचे देखील असंख्य फायदे आहेत…. जाणून घ्या
भारतीय जेवणामध्ये भरपूर प्रमाणात मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. वेलची ही एक अशी गोष्ट...
न्यूमोनियामुळे फुप्फुसांचाच नाही तर सांधेदुखीचा त्रास सुद्धा होतो का?
सरकारने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करणं बंद करावं, रोहित पवार यांनी सुनावले
आपल्या किचनमध्ये दडलेत पित्तावरील रामबाण उपाय, जाणून घ्या
Delhi Bombblast बाबरीचा घ्यायचा होता बदला, सहा डिंसेंबर सहा ठिकाणं… असा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
Photo – आता मालिकांमध्येही प्री वेडिंग शूट, पाहा सखी-कान्हाचं फोटोशूट
पॅनिक अटॅक आणि थरकाप; शोएब मलिकसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाची झालेली वाईट अवस्था