Delhi Bombblast बाबरीचा घ्यायचा होता बदला, सहा डिंसेंबर सहा ठिकाणं… असा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटात सामिल असलेल्या दहशतवाद्यांना 6 डिसेंबर रोजी दिल्लीत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवायचे होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशिद पाडण्यात आली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी 6 डिसेंबर या तारखेलाच हे बॉम्बस्फोट करायचे असे ठरवण्यात आले होते.
या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांनी पाच टप्प्यात योजना आखली होती.
पहिला टप्पा – जैश ए मोहम्मद आणि गझवा उल हिंदशी संबंधित टेरर मॉड्यूल तयार करणे
दुसरा टप्पा – स्फोटके बनवण्यासाठी हरयाणातील नूह व गुरुग्राम येथून साहित्य जमा करणे.
तिसरा टप्पा – केमिकेल आयईडी तयार करणे
चौथा टप्पा – तयार केलेली स्फोटके वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहचवणे.
पाचवा टप्पा – दिल्लीत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List