भाविकांसाठी पोलीस सज्ज

भाविकांसाठी पोलीस सज्ज

कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर 2025 रोजी असून, या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.

कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक, 12 पोलीस उपअधीक्षक, 30 पोलीस निरीक्षक, 127 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 386 पोलीस अंमलदार व 1 हजार 500 होमगार्ड तसेच 2 एसआरपीएफ कंपनी, 04 बीडीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी दोन पथके, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित 10 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी 8 ठिकाणी पथके स्थापन केली आहेत.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाद्वार, महाद्वार घाट, पत्राशेड यांसह आदी ठिकाणी 12 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माउली स्कॉडची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी शहराबाहेर 12, तर शहरांतर्गत 10 ठिकाणी डायव्हर्शन पॉइंट सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर खासगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 16 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.

3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचारी
7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे
16 ठिकाणी वाहनतळ
सुमारे 11 हजार वाहनांची पार्ंकग व्यवस्था
12 वॉच टॉवर; पाच अतिक्रमण पथके

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक